ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
छत्रपती संभाजीनगर हे महाराष्ट्रातील ऐतिहासिक शहर आहे. येथे पर्यटनासाठी अनेक प्रसिद्ध ठिकाणं आहेत.चला तर जाणून घेऊया ही ठिकाणं कोणती.
बीबी का मकबरा याला महाराष्ट्राचे ताजमहल म्हटल जातं. 16 व्या दशकात औरगंजेबचा मुलगा आजम शाह याने आपली आई दिलरास बानू बेगमसाठी ताजमहल सारखा दिसणारा बीबी का मकबरा बांधले होते.
युनेस्को वर्ल्ड हेरिटेजमध्ये अंजठा लेणीचा समावेश आहे. अजंठा लेणी छत्रपती संभाजीनगर मधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ आहे. येथे प्राचीन काळातील ३० बुद्धाचे लेणी आहेत.
एलोरा लेणीतील रॅाक कट वास्तुकला पाहण्यासारखी आहे. ही वास्तुकला हिंदू, बौद्ध आणि जैन धर्माच्या एकतेचे प्रतीक दर्शवते.
दौलताबाद किल्ल्याला देवगिरी किल्ला म्हणूनही ओळखला जातो. हा किल्ला पूर्वी भारतातील अपराजित किल्ला म्हणूनही ओळखला जातो.
1435 मध्ये अल उद दिन बाहमनी यांनी चांद मिनार बांधला होता. दौलताबाद किल्ल्याजवळ असलेले हे ठिकाण पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.
पवित्र आणि शांत वातावरण असलेले हे धार्मिक स्थळ १२ ज्योर्तिलिंगापैकी एक आहे. जर तुम्ही धार्मिक स्थळाला भेट देण्याचा विचार करत असाल तर येथे नक्की भेट द्या.
हे एक खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे. उल्कापिंडाच्या टक्करमुळे बेसॅाल्ट खडकापासून तयार झालेले हे तलाव पर्यटनासाठी प्रसिद्ध आहे.
NEXT: सोप्या पद्धतीने घरच्या घरी बनवा चटपटीत आवळ्याचे लोणचं