ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पोषक तत्वाने भरपूर असलेला आवळा खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात.
तुम्ही अनेकदा आवळा खाल्ला असेल पण तुम्ही कधी आवळ्याचे लोणचं खाल्ले आहे का? नसेल तर एकदा नक्की ट्राय करा.
आज आम्ही तुम्हाला आवळ्याच्या लोणच्याची रेसीपी सांगणार आहोत. जे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरात बनवू शकता.
सर्वप्रथम आवळा स्वच्छ धुवून साफ करुन घ्या.
आवळ्याचे मोठे काप करुन यामध्ये हळद आणि मीठ ॲड करुन मिक्स करा. एका बंद डब्यात हे मिश्रण २४ तासांसाठी ठेवा.
गरम तेलामध्ये मोहरी, मेथीचे दाणे, लाल मिरची, हिरवी मिरची आणि हिंग ॲड करा.या मिश्रणाला थंड होऊ द्या.
तयार केलेला मसाला आवळ्याच्या मिश्रणात ॲड करा आणि मिक्स करा. तसेच उरलेल्या तेलात हे मिश्रण परतून घ्या.
झटपट पद्धतीले लोणचं तयार झाले. तुम्हाला अजून तिखट चव हवी असेल तर तुम्ही यात अजून लाल मिरची ॲड करु शकता.
NEXT: हिवाळ्यात वजन करण्यासाठी 'या' टिप्स करा फॅालो