ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
हिवाळ्यात अनेक जण थंडीमुळे व्यायाम करणं टाळतात आणि आळशी होतात.
हिवाळ्यात अनेकांना अधिक कॅलरी असलेले पदार्थ खायला आवडतं. ज्यामुळे वजन वाढते. वाढलेले वजन कमी करण्यासाठी जीवनशैलीत काही बदल करण्याची गरज असते.
हिवाळ्यात सूर्यप्रकाशात बसल्याने शारीरिक हालचाल करण्यास मदत होते. तसेच मेटाबॅालिजम रेट वाढण्यास मदत होते.
कोमट पाणी पिल्याने हिवाळ्यात शरीर हायड्रेट राहण्यास मदत होते. तसेच फॅट्स बर्न होण्यास मदत होते.
पालक, मेथी आणि ब्रोकोली या भाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते त्यामुळे यांचा डाएटमध्ये समावेश करा.
दररोज ३० ते ४० मिनिटे योगा किंवा व्यायाम करा. किंवा घरातच तुमच्या आवडीचा कोणताही व्यायाम करा.
थंडीत चहा किंवा कॅाफी पिण्यापेक्षा तुम्ही ग्रीन टी किंवा हर्बल टीचे सेवन करू शकता. यामुळे फॅट्स बर्न होण्यासही मदत होईल.
दररोज ८ ते ९ तासांची झोप घ्या. झोप पूर्ण न झाल्यास याचा परिणाम आरोग्यावर होतो.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: दूधासोबत चुकूनही या पदार्थांचे सेवन करु नये; अन्यथा होतील गंभीर परिणाम