ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
दूधाचा डाएटमध्ये समावेश केल्यास आरोग्याला अनेक फायदे होतात.
दूधासोबत काही पदार्थांचे सेवन केल्याने आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात.
दूधासोबत चुकूनही दहीचे सेवन करु नये यामुळे पोट खराब होऊ शकते.
आंबट फळे आणि दूधाचे एकत्र सेवन करु नये. यामुळे पोटाचे विकार आणि उल्टीची समस्या होऊ शकते.
दूध आणि मासे एकत्र खाल्ल्यास पचनाची समस्या होऊ शकते. यामुळे अपचन, उल्टीचा त्रास होऊ शकतो.
दूधासोबत मसालेयुक्त पदार्थांचे सेवन केल्याने तुमचे आरोग्य बिघडू शकतं.
चटपटीत नाश्ता खात असाल तर दूध पिणं टाळा यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
अनेकांना गूळाचा चहा हेल्दी वाटतो. परंतु गूळ आणि दूध एकत्र खाऊ नये यामुळे पचनाची संबधित अनेक समस्या होऊ शकतात.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.
NEXT: थंडीत लग्नामध्ये स्टायलिश लूक हवाय? मग 'हे' ट्रेंडी ब्लाऊज डिझाइन करा ट्राय