nandurbar, psi kailas pawara saam tv
महाराष्ट्र

PSI Success Story: शेतमजुर मुलगा पीएसआय हाेताच आई-वडिलांना आनंदाश्रू अनावर...

PSI Kailas Pawara Story: गावखेड्यातील कैलासने मैदानी चाचणीतही शंभरपैकी 93 गुण घेऊन आपले वर्चस्व सिद्ध केले.

Siddharth Latkar

- सागर निकवाडे

Nandurbar PSI Story: परिस्थितीशी दोन हात करत असताना एकीकडे पुनर्वसनासाठी प्रशासनाशी संघर्ष तर दुसरीकडे आहे त्या परिस्थितीत स्पर्धा परीक्षांचा अभ्यास या दुहेरी संघर्षात कैलास यशस्वी झाला आणि संपुर्ण पावरा (psi kailas pawara) कुटुंबाचा आनंद गगनात मावेनासा झाला. (Maharashtra News)

अक्कलकुवा तालुक्यातून सरदार सरोवर प्रकल्पामुळे कैलास पावरा यांचा परिवार विस्थापित झाला. 14 वर्षानंतर ही सरकारने आणि प्रशासनाने त्यांचे पुनर्वसन केले नाही. पुनर्वसन वसाहतीत राहणाऱ्या पावरा परिवाराकडे ना शेतजमीन ना हक्काचे घर अशी परिस्थिती असतानाही कैलासने नर्मदा अभियानाच्या शाळांमध्ये शिक्षण घेतले. पुढे पदवीधर झाला आणि स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून तो पोलीस उपनिरीक्षक झाला.

कैलासचे पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण जि.प.शाळा रोझवा पुनर्वसन येथे तर, पाचवी ते बारावीपर्यंतचे शिक्षण धुळे जिल्ह्यातील श्री छत्रपती शिवाजी सैनिकी विद्यालय मोराणे येथे झाले. त्यानंतर जळगाव येथील मूळजी जेठा महाविद्यालयात कला शाखेच्या पदवीचे शिक्षण घेतले.

कुटुंबाला हातभार, सोबतच परीक्षेची तयारी पदवीच्या तृतीय वर्षाला असताना कैलासने एमपीएससीची पूर्व परीक्षा दिली. सप्टेंबर 2022 मध्ये मुख्य परीक्षा झाली. त्यानंतर फेब्रुवारी 2023 मध्ये मैदानी चाचणी तर, मार्च 2023 मध्ये मुलाखत पार पडली.

या परीक्षेचा अंतिम निकाल मंगळवारी (ता.4) जाहीर झाला. यात कैलासने यश संपादन करून पीएसआय पदाला (police sub inspector) गवसणी घातली आहे. गावखेड्यातील या युवकाने मैदानी चाचणीतही शंभरपैकी 93 गुण घेऊन आपले वर्चस्व सिद्ध केले. कैलासने कुटुंबाला आधार देण्यासाठी आई-वडिलांच्या खांद्याला खांदा लावून शेतात मोलमजुरी केली आहे. सोबतच स्पर्धा परीक्षेची तयारी केली.

यशस्वी होण्यासाठी सर्व सुविधाच हव्यात असं नाही, तर जिद्दीच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीतही उज्ज्वल यश मिळवता येतं, हे कैलास पावरा या तरुणाने दाखवून दिलं आहे. कठोर मेहनतीच्या बळावर एमपीएससीच्या परीक्षेत यश संपादन करून वयाच्या 24 व्या वर्षी पोलीस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT