Chandrapur Crime News : सोनापूर हादरलं ! पुतण्याने माेठ्या आईला दगडाने ठेचलं, पाेलिस तपास सुरु

पाेलिस संशयिताचा शाेध घेताहेत.
chandrapur, Crime News
chandrapur, Crime News Saam Tv

Chandrapur News : पुतण्याने मोठ्या आईची दगडाने ठेचून हत्या केल्याची गंभीर घटना चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभूर्णा पोलिस ठाण्याच्या (pombhurna police station) हद्दीतील सोनापूर (sonapur) येथे घडली. सुनेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न पुतण्याने केल्याची माहिती आईला मिळाली. त्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या मोठ्या आईचा पुतण्याने दगडाने ठेचून खून केला. (Maharashtra News)

chandrapur, Crime News
Congress News : 'मोदी है, तो मुमकिन है' काॅंग्रेस प्रदेशाध्यक्षांचा टाेला, उन्हाळ्यात पावसाळा...

खुनाचा पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने मृतदेह शेणाच्या खड्ड्यात टाकून आरोपी पुतण्या फरार झालं. पुष्पा मधुकर ठेंगणे (वय ६२), रा.सोनापूर असे मृतक महिलेचे नाव असून आरोपी धिरज रविंद्र ठेंगणे (वय २०) रा. सोनापूर हा फरार आहे.

chandrapur, Crime News
Jalna Railway News: जालन्यात रेल्वे मार्गावर घातपाताचा कट, रूळावर ठेवला लोखंडी ड्रम; मोटरमनच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला

मृत महिलेची पिडीत सून ही शेतातून दुपारी घरी परत येत असताना आरोपी हा आपल्याच गुराच्या गोठ्याजवळ काम करीत असताना ओझे उचलण्याच्या बहाण्याने तिला बोलावून तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र तिने तिथून पळ काढून घरी येऊन सर्व आपबिती आपल्या सासूला सांगितली.

chandrapur, Crime News
How can snails be controlled ? शेतकरी मित्रांनो ! गोगलगायपासून सावधान, वाचा कृषी विद्यापीठाचा महत्त्वपूर्ण सल्ला

मृतक सासू त्याला जाब विचारण्यासाठी आरोपीकडे गेली असता आरोपी धिरज याने चुलत मोठ्या आईला दगडाने ठेचून तिचा खून केला. यामुळे कुटुंबीय चिंतेत पडले. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालय पोंभूर्णा येथे शवविच्छेदन करण्यात आले. पोलिस फरार आरोपीचा शोध घेत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com