Shruti Vilas Kadam
बेसन, हळद आणि गुलाबपाणी यांचा फेस पॅक त्वचेवरील मळ आणि अतिरिक्त तेल कमी करून त्वचा स्वच्छ व उजळ दिसण्यास मदत करतो.
हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे पिंपल्स आणि अॅक्ने कमी करण्यास मदत करतात. नियमित वापराने त्वचा अधिक स्वच्छ दिसते.
बेसन त्वचेतील जास्तीचे तेल शोषून घेतो. त्यामुळे ऑयली स्किन असणाऱ्यांसाठी हा फेस पॅक खूप उपयुक्त ठरतो.
गुलाबपाणी त्वचेला नैसर्गिक ताजेपणा देतं आणि त्वचा हायड्रेट ठेवण्यास मदत करतं. त्यामुळे चेहरा मऊ आणि फ्रेश दिसतो.
हा फेस पॅक त्वचेवरील मृत पेशी (डेड स्किन) काढून टाकण्यास मदत करतो आणि त्वचा अधिक गुळगुळीत बनवतो.
एका वाटीत 2 चमचे बेसन, चिमूटभर हळद आणि 2-3 चमचे गुलाबपाणी घालून पेस्ट तयार करा. ही पेस्ट चेहऱ्यावर समान पसरवा.
हा फेस पॅक चेहऱ्यावर 10-15 मिनिटे ठेवा. नंतर कोमट पाण्याने हलक्या हाताने धुवा. आठवड्यातून 2 वेळा वापरल्यास चांगले परिणाम दिसू शकतात.