Saam Impact : चिमुकल्या गणेश माळीच्या संघर्षाची कहाणी पाहून डाेळे पाणावले, जिद्दीला मुख्यमंत्र्यांकडून सलाम

गणेश माळी हा चिमुकला दोन्ही हातांनी दिव्यांग आहे. शिक्षणाप्रती त्याची जिद्द साम टीव्हीच्या माध्यमातून जनेतने पाहिली.
cm eknath shinde, ganesh mali
cm eknath shinde, ganesh malisaam tv
Published On

- सागर निकवाडे

Ganesh Mali News : नंदूरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील असलोद येथील गणेश माळी या बारा वर्षीय विद्यार्थ्याची संघर्षाची कहाणी साम टिव्हीने जनतेसमाेर आणल्यानंतर समाजातुन त्याला मदतीचा हात पुढे आलाच तर राज्याचे मुख्यमंत्र्यांनी देखील गणेशच्या भावी वाटचालीसाठी पाच लाख रुपयांची (cm eknath shinde helped ganesh mali from nandurbar) मदत केली. (Latest Marathi News)

cm eknath shinde, ganesh mali
Tulja Bhavani Mandir : भाविकांनाे तुळजाभवानी अभिषेक पुजेच्या शुल्कात माेठी वाढ, साेमवारपासून अंमलबजावणी; पुजा-यांचा विराेध

साम टीव्हीवर गणेश माळी या चिमुकल्याने अंपगावर मात करत शिक्षणासाठी धडपड आणि त्याचा जीवन जगण्याचा संघर्ष पाहून अनेकांचे डोळे पाणावले. त्यानंतर गणेशच्या कुटुंबाला समाजातून मदत मिळू लागली. मंत्री गिरीश महाजन यांनी देखील गणेशला मदतीसाठी सहकार्य केले.

चिमुकल्या वयात ममता मुकलेल्या आणि दाेन्ही हात नसलेल्या गणेशची शिक्षणाची आवड आणि त्याच्या जिद्दीला सलाम करत श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने गणेशच्या पुढील शिक्षणासाठी पाच लाख रुपयांची मदत नुकतीच करण्यात आली.

हा मदतीचा धनादेश गणेशला वर्षा बंगला येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देण्यात आला. मुख्यमंत्री शिंदे यांनी त्याबाबत ट्विट करुन गणेशच्या जिद्दीचे काैतुक केले आहे.

कवी कुसुमाग्रज्यांच्या अनंत आमची ध्येयासक्ती.... अनंत अन आशा....किनारा तुला पामराला.. असे लिहित नंदुरबार (nandurbar) जिल्ह्यातील शहादा तालुक्यातील असलोद येथील तिसऱ्या इयत्तेत शिकणाऱ्या गणेश माळी याचे मुख्यमंत्र्यांनी काैतुक केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com