ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
उन्हाळा सुरु झाल्यावर बाजारात मोठ्या प्रमाणात मँगो मिळतात आणि ते सगळेच जण आवडीने खातात. मँगो पासून तुम्ही घरीच थंडगार आईस्क्रीम बनवू शकता.
मँगो आईस्क्रीम बनवण्यासाठी पिकलेले आंबे, दूध, क्रिम, साखर आणि व्हॅनिला एसेंस इत्यादी साहित्य लागते.
आंब्यांना स्वच्छ धुवून सोलून घेऊन त्यातील गर काढा आणि मिक्सरमध्ये बारिक करुन घ्या. जेणेकरुन मऊ प्युरी बनली जाईल.
एका बाऊलमध्ये दूध, साखर आणि व्हॅनिला एसेंस घेऊन ते चांगले मिक्स करून घ्या.
आता बनवलेली मँगो प्युरी दूध आणि क्रीमच्या मिश्रणात टाका आणि नीट मिक्स करुन घ्या.
तयार केलेले मिश्रण आईस्क्रीमच्या भांड्यात ठेवा आणि फ्रीजरमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्या.
काही वेळानंतर, आईस्क्रीम चेक करा आणि चमचाने हळूवारपणे ढवळा जेणेकरुन गुठल्या होणार नाहित.
आईस्क्रीमच्या भांड्यातून आईस्क्रीम बाहेर काढा. ताज्या मँगोचे तुकडे आईस्क्रीमवर टाकून डिश सजवा आणि सर्व्ह करा.