ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
लहानांपासून मोठ्यांपर्यंत आईस्क्रीम सगळ्यांनाच आवडते. खासकरुन उन्हाळ्यात आईस्क्रीम खाण्याची मज्जा काही वेगळीच असते.
संत्र्याचे आईस्क्रीम बनवण्यासाठी संत्र्याचा रस, दूध, क्रीम, साखर आणि व्हॅनीला एसेंस इत्यादी साहित्य लागते.
सगळ्यातआधी संत्र्याचा रस काढून घ्या. रस काढल्यानंतर तो गाळून घ्या जेणेकरुन बीया वेगळ्या होतील.
दूध आणि क्रीमला चांगले फेटून घ्या, जेणेकरुन मिश्रण हलके आणि मऊ होईल.
आता त्यात साखर मिक्स करा आणि साखर पूर्णपणे विरघळत नाही तोपर्यंत मिश्रण फेटत राहा. त्यानंतर संत्र्याचा रस आणि व्हॅनीला एसेंस टाका आणि मिक्स करुन घ्या.
हे मिश्रण आईस्क्रीमच्या साच्यात टाका आणि फ्रीजरमध्ये ६ ते ८ तासांसाठी ठेवून द्या.
आता आईस्क्रीमला फ्रीजरमधून काढा. काहि मिनिटे बाहेर ठेवा जेणेकरुन सर्व्ह करण्यास सोपे जाईल. डिश सजवा आणि सर्व्ह करा.