LPG Shortage: गॅसचा तुटवडा; रेल्वेतील खाद्यसेवा बंद| VIDEO

LPG Shortage Effect on Railway Food: रेल्वेतील भोजन सेवा बंद करण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे. एलपीजी गॅसचा तुटवडा असल्याने आयआरसीटीसी किचनमध्ये पुरेसा गॅस नाहीये. त्यामुळे खाद्यसेवा तात्पुरती बंद केली आहे.

आखाती युद्धाच्या पार्श्वभूमीवर व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या तुटवड्याचा परिणाम आता रेल्वे केटरिंग सेवेवर दिसू लागला आहे. आयआरसीटीसीच्या मुंबई सेंट्रल किचनमध्ये गॅसचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे रेल्वेगाड्यांमधील खाद्यसेवा तात्पुरती बंद करण्याचा विचार सुरू आहे. गॅस पुरवठा आणखी कमी झाल्यास जेवण तयार करणे कठीण होणार आहे. त्यामुळे आधीच जेवण आरक्षित केलेल्या प्रवाशांना पैसे परत करण्याची तयारी आयआरसीटीसीने दर्शवली आहे. यामुळे येत्या काळात आयआरसीटीसीच्या माध्यमातून देण्यात येणारी खाद्यपदार्थ सेवा स्थगित करण्याच्या सूचना रेल्वे मंडळाला केल्या आहेत. राजधानी, वंदे भारतसह अन्य रेल्वेगाड्यांमध्ये देण्यात येणारे जेवण आणि खाद्यपदार्थ आयआरसीटीसीच्या किचनमध्ये तयार करण्यात येतात.आयआरसीटीसीच्या माध्यमातून देशभरात रोज सुमारे १७ लाख प्रवाशांना जेवण पुरवण्यात येते. परंतु आता गॅसचा तुटवडा झाल्याने रेल्वेतील जेवण मिळणे बंद होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com