- विजय पाटील / अमर घटारे
Sangli News : अमरावती येथे उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांचे पोस्टर फाडल्याचे पडसाद सांगली जिल्ह्यात उमटले. सांगली जिल्ह्यातील मिरजे येथे उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांनी खासदार नवनीत राणा (mp navneet rana) आणि आमदार रवी राणा (mla ravi rana) यांच्या पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त केला. (Maharashtra News)
अमरावती येथे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे बॅनर फाडल्याने राज्यभरात समाज माध्यमातून विराेधकांचा तीव्र समाचार घेतला जात आहे. मिरज येथे शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांचा पोस्टरला जोडे मारून निषेध व्यक्त केला.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाने मिरज शहर महाराणा प्रताप चौक येथे हे निषेध आंदोलन केले. यावेळी तालुकाप्रमुख विशाल सिंह राजपूत शहर प्रमुख चंद्रकांत माईगुरे, विधानसभा क्षेत्र प्रमुख तानाजी सातपुते महादेव हुलवान,पप्पू शिंदे महिला आघाडी शहर प्रमुख शाकेरा जमादार आदी तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
गनिमी काव्याने उद्धव ठाकरेंना साडी चाेळी देणार
दरम्यान आमदार रवी राणा यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करत उद्धव ठाकरे ना मर्द म्हटलं आहे. राणा म्हटले कोरोना काळात घरी बसणारा मुख्यमंत्री जनतेने ठाकरेंच्या रुपाने पाहिले. आज उद्धव ठाकरे हे अमरावती येथे चार वर्षानंतर येताहेत.
एका महिला खासदार नवनीत राणा या हनुमान चालिसा वाचते म्हणून जेलमध्ये टाकले. सत्तेचा दुरुपयाेग करुन ठाकरेंसारख्या ना मर्दास आज महिला साडी चोळीचा आहेर देणार असल्याचे आमदार राणा यांनी नमूद केले.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.