We want Justice सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात NSUI चे विद्यार्थ्यांसह आंदाेलन

हा सर्व पेपर आयटी विभागाच्या अभ्यासक्रमावर आधारित आला होता असे विद्यार्थी सांगतात.
pune , NSUI Andolan, Savitribai Phule University
pune , NSUI Andolan, Savitribai Phule Universitysaam tv

- सचिन जाधव

Pune News : विद्यापीठ प्रशासन नियमीत विद्यार्थ्यांना जाणीवपूर्वक त्रास देत असल्याचे निषेर्धात आज (शनिवार) पुणे शहर विद्यार्थी काँग्रेसने (एनएसयुआय) सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन छेडले. अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग या विषयाच्या पेपर पुन्हा घेऊ नये अशी मागणी आंदाेलकांची आहे. (Maharashtra News)

pune , NSUI Andolan, Savitribai Phule University
Ajit Pawar News : 'अजित पवार साता-याचे पालकमंत्री ? तुम्हांला काय वाटतं...' (पाहा व्हिडिओ)

अभियांत्रिकीच्या द्वितीय वर्षाच्या सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग या विषयाच्या पेपरमध्ये अभ्यासक्रमाच्या बाहेरील प्रश्न आले. या पेपरमध्ये अभ्यासक्रमाबाहेरील प्रश्न आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये तणावाच्या आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे आज विद्यार्थ्यांसह पुणे शहर विद्यार्थी काँग्रेसने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात (university) आंदोलन (aandolan) केले.

pune , NSUI Andolan, Savitribai Phule University
Kass Pathar Satara : चिंब भिजलेले, रूप सजलेले ! पर्यटकांना खुणावताेय एकीव धबधबा (पाहा व्हिडिओ)

हा सर्व पेपर आयटी विभागाच्या अभ्यासक्रमावर आधारित आला होता. या सर्व प्रकारामुळे विद्यार्थी यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना (students) उत्तीर्ण करावे किंवा ऑनलाईन पद्धतीने किंवा बहुपर्यायी प्रश्नने पुन्हा परीक्षा घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी काँग्रेसने विद्यापीठास केली आहे.

Edited By : Siddharth Latkar

Read the latest Marathi news and watch Live Streaming on Saam TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education at Saam TV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv Marathi news Channel app for Android and IOS.

साम आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुकट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, साम टीव्हीच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Saam TV Marathi News | साम टीव्ही
saamtv.esakal.com