Sangli News : सांगलीच्या वाळवा तालुक्यातील कुरळप येथील भगवान देवकर या शेतकऱ्याने पस्तीस गुंठे क्षेत्रामध्ये महागडी औषधे फवारणी आणि लागवडी करून साठ हजार रुपये खर्चून भेंडी पीक घेतले होते. मात्र सध्या भेंडीला दर नसल्याने पोटच्या पोरांसारखे सांभाळलेल्या पिक काढून टाकण्याची वेळ सध्या शेतकऱ्यावर आली आहे. (Maharashtra News)
या शेतक-याला 35 गुंठे क्षेत्रात दोन ते तीन लाखाचे उत्पन्न मिळणे अपेक्षित होते. मात्र भेंडीला (vegetables) प्रति किलो 7 रुपये ते 15 रुपया पर्यंत किलोला दर मिळत असल्याने लागवडीचा खर्च सुद्धा निघत नसल्याने शेतक-याने भेंडी शेतात मेंढरं सोडली.
सध्या रासायनिक लागवडीचे दर गगनाला भिडले असल्याने शेती करणे शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. तर भेंडीला प्रति किलो 7 रुपये ते 15 रुपया पर्यंत किलोला दर मिळत आहे. यामध्ये दलाली 10 टक्के वाहतूक आणि नगास 25 रुपये हमाली 4 रुपये तोलाई याप्रमाणे मिळालेल्या दरातून शेतकऱ्याला पदरात काही पडत नव्हते. उलट स्वतः पदरमोड करावी लागत आहे.
सध्या ग्रामीण शहरी बाजारात 40 ते 60 रुपये किलो प्रमाणे भेंडीचा दर आहे. व्यापारी व घाऊक व्यापारी हे दोघे मिळून शेतकऱ्यांना (farmers) फसवत असल्याचे चित्र आहे. त्याबाबत शेतकऱ्याने बोलून दाखवले आहे. आज देवकर यांनी भरात आलेले भेंडी पिकात मेंढरं सोडून पीक काढून टाकले. यामुळे देवकर यांना तीन लाखाचे नुकसान सोसावे लागणार आहे.
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.