Parbhani Violence Saam Tv News
महाराष्ट्र

Parbhani Violence: परभणीत पुन्हा वातावरण तापलं, हिंसाचारप्रकरणी अटक केलेल्या तरुणाचा पोलिस कोठडीत मृत्यू

Parbhani News: परभणीच्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी अनेकांना अटक केली होती. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तरुणाचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याची घटना घडली.

Priya More

परभणीमध्ये संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती. या घटनेनंतर परभणीमध्ये संतप्त झालेल्या आंबेडकर अनुयायांनी बंदची घोषणा करत आंदोलन केले. या आंदोलनाला हिंसक वळण आले. आंदोलनादरम्यान विविध ठिकाणी दगडफेक, तोडफोड आणि जाळपोळीच्या घटना घडल्या.

परभणीच्या हिंसाचारप्रकरणी पोलिसांनी अनेकांना अटक केली होती. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तरुणाचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर आता परभणीतील वातावरण पुन्हा तापले आहे. हिंसाचार प्रकरणी परभणी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने नवा मोंढा/नानलपेठ पोलिस ठाण्यात गुन्हाची नोंदी करत काही तरुणांना पोलिसांनी अटक केली होती. अटक केलेल्या तरुणांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली होती.

परभणी शहरात बुधवारी दिवसभरात विविध ठिकाणी झालेल्या तोडफोड आणि नुकसानाच्या प्रकरणात पोलिस यंत्रणेकडून संध्याकाळनंतर आरोपींची धरपकड सुरू करण्यात आली होती. यामध्ये पोलिसांनी समाजमाध्यमावर व्हायरल झालेल्या व्हिडिओसह विविध माहिती आणि तपासाच्या माध्यमातून अनेकांना ताब्यात घेतले होते. यात नवा मोंढा/नानलपेठ पोलिस ठाण्यात आरोपींना आणल्यावर त्यांची चौकशी केली जात होती. पोलिस यंत्रणेकडून यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद करून ताब्यात घेत आरोपींना पोलिस आणि न्यायालयीन कोठडी सुनावल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली.

हिंसाचार प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या ३५ वर्षीय सोमनाथ शंकर सूर्यवंशी या तरुणाचा मृत्यू झाला. परभणीत झालेल्या घटनेनंतर पोलिसांनी सोमनाथला ताब्यात घेतलं होतं. सोमनाथला जिल्हा सामान्य रुग्णालयात आणले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परभणी आगाराची बस सेवा बंद केली आहे. सोमनाथच्या मृत्यूची बातमी कळताच शहरातील दुकाने बंद ठेवण्यात आली आहेत. पोलिसांनी सोमनाथ यांचा मृत्यू हृदयविकाराने झाला असल्याची माहिती दिली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे नडणार, महायुतीला भिडणार? राज-उद्धव ठाकरेंची युती बदलणार सत्तेचं गणित?

Maharashtra Politics : आगामी काळात एकनाथ शिंदेंही ठाकरेंसोबत जातील; पुण्यातील बड्या नेत्याचा दावा

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे अखेर एकत्र; या ऐतिहासिक क्षणाची सुरुवात नेमकी कुठून? वाचा सविस्तर...

Maharashtra Live News Update: लालू यादव पुन्हा एकदा बनले राजदचे अध्यक्ष; राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीत निर्णय

Rebies: रेबीज का होतो, सुरुवातीची लक्षणे कोणती?

SCROLL FOR NEXT