Pune Tourism : आताच ठरवा! वीकेंडला करा पुण्याची सफर; 'येथे' बोटिंग, कॅम्पिंग अन् ट्रेकिंगचा घ्या आनंद

Shreya Maskar

वीकेंड ट्रिप

उन्हाळ्यात थंड हवेच्या ठिकाणी ट्रिप प्लान करा. तुम्ही वीकेंडला मुंबईजवळ असलेल्या पुणे शहराला भेट द्या. पुण्यात मावळ नावाचे एक सुंदर ठिकाण आहे. जेथे तुम्ही निवांत वेळ घालवू शकता.

Weekend | yandex

पुणे

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुका हे निसर्गरम्य किल्ले, धरणे आणि भातशेतीसाठी प्रसिद्ध आहे.

Pune | google

धार्मिक स्थळे

पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात ही दोन्ही महत्त्वाची धार्मिक स्थळे आहेत. यात प्रतिशिर्डी (शिरगाव) आणि एकविरा देवी मंदिर (कार्ला) ही स्थळे आहेत.

Religious | google

ट्रेकिंग- किल्ले

मावळातील आकर्षणांमध्ये लोणावळ्याजवळील निसर्गरम्य धबधबे, प्राचीन गुहा आणि ऐतिहासिक किल्ले आहेत. ट्रेकिंग आणि निसर्ग प्रेमींसाठी आदर्श ठिकाण आहे.

Trekking | yandex

पर्यटन आकर्षण

कॅम्पिंगसाठी पवना तलाव, लोहगड आणि विसापूर किल्ले, कार्ला/भाजा लेणी आणि कुणे धबधबा ही निसर्गरम्य ठिकाणे आहेत. लायन्स पॉइंटवरून निसर्गाचे विहंगम दृश्ये दिसते आणि टाकवे तलावावर बोटिंग होते.

camping | yandex

पुणे पर्यटन स्थळे

शनिवारवाडा, सिंहगड, आगाखान पॅलेस, लाल महाल, सारसबाग, पाताळेश्वर लेणी हे पुण्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळे आहेत.

Shaniwarwada | yandex

कसे जावे?

मुंबईहून तुम्ही पुण्याला बाय रोड किंवा ट्रेनने जाऊ शकता. त्यानंतर पुणे स्टेशनपासून मावळपर्यंत बस किंवा ट्रेनने प्रवास करा.

travel | yandex

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Pune | google

NEXT : अलिबागमध्ये लपलंय स्वर्गाहून सुंदर कपल स्पॉट, जोडीदारासोबत 'या' समुद्रकिनारी मारा फेरफटका

Alibag Tourism | saam tv
येथे क्लिक करा...