Alibag Tourism : अलिबागमध्ये लपलंय स्वर्गाहून सुंदर कपल स्पॉट, जोडीदारासोबत 'या' समुद्रकिनारी मारा फेरफटका

Shreya Maskar

कपल स्पॉट

तुम्हाला जोडीदारासोबत मुंबईजवळच फिरायला जायचे असेल तर अलिबाग उत्तम लोकेशन आहे. अलिबागमध्ये निसर्गाच्या सानिध्यात एक सुंदर किनारा लपला आहे.

Awas Beach | yandex

आवास बीच

आवास बीच हे अलिबागजवळील मांडवाजवळ वसलेले एक शांत, स्वच्छ आणि गर्दी नसलेले पर्यटन स्थळ आहे. तुम्ही येथे समुद्रकिनारी भन्नाट कपल फोटोशूट करू शकता.

Awas Beach | yandex

वीकेंड प्लान

सोनेरी वाळू, सुरू आणि नारळाच्या झाडांची दाट झाडांनी वेढलेले हे ठिकाण निसर्ग सौंदर्यने पर्यटकांना आकर्षित करते. हे ठिकाण मुंबई/पुण्याहून वीकेंडसाठी उत्तम आहे.

Weekend | yandex

सूर्यास्त

आवास बीचवरून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. तुम्ही येथे संध्याकाळी निवांत फेरफटका मारू शकता. तुम्हाला येथे थंड वाऱ्यांची झुळूक अनुभवता येईल.

Awas Beach | yandex

प्रमुख आकर्षण

आवास बीचवर मासेमारी पाहण्यासाठी, किनारी संस्कृतीचा अनुभव घेण्यासाठी आणि कोकणी सीफूडचा आनंद घेण्यासाठी पर्यटक येतात.

Awas Beach | yandex

जलक्रीडा

आवास बीचवर जलक्रीडांचा आनंद घेऊ शकता. तसेच आवास बीचच्याजवळ अनेक बजेट-फ्रेंडली रिसॉर्ट्स, हॉटेल्स पाहायला मिळतात.

Water Sports | yandex

पक्षी निरीक्षण

आवास बीच हे पक्षी निरीक्षणासाठी एक उत्तम आणि शांत ठिकाण आहे. हे ठिकाण अरबी समुद्राच्या किनाऱ्यावर असून, सकाळी लवकर गेल्यास विविध प्रकारचे सागरी पक्षी आणि स्थानिक पक्षी पाहता येतात.

Birdwatching | yandex

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Awas Beach | yandex

NEXT : निसर्गरम्य टेकड्यांमध्ये वसलंय सुंदर पर्यटन स्थळ, नाशिकला गेल्यावर 'येथे' एकदा मारा फेरफटका

Nashik Tourism | saam tv
येथे क्लिक करा...