Nashik Tourism : निसर्गरम्य टेकड्यांमध्ये वसलंय सुंदर पर्यटन स्थळ, नाशिकला गेल्यावर 'येथे' एकदा मारा फेरफटका

Shreya Maskar

नाशिक

नाशिक जिल्ह्यातील सिन्नर शहर हे यादवांची पहिली राजधानी असल्याने या भागात ऐतिहासिक महत्त्व असलेले अनेक किल्ले आहेत. नाशिक फिरायला गेल्यावर येथे नक्की जा.

Nashik | google

सिन्नर

नाशिक मधील सिन्नर येथे डुबेरगड (डुबेरा), आडगड, औंढा आणि सोनगड ही ऐतिहासिक ठिकाणे आहेत. हे किल्ले प्रामुख्याने राजधानीच्या संरक्षणासाठी आणि मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी वापरले जात असे.

fort | google

ट्रेकिंग स्पॉट

सिन्नर येथे किल्ले ट्रेकिंग स्पॉट आहेत. तुम्ही येथे निसर्गाच्या सानिध्यात सुंदर फोटोशूट करू शकता.

trekking | google

गोंदेश्वर मंदिर

सिन्नर येथील गोंदेश्वर मंदिर हे ११ व्या-१२ व्या शतकातील यादवाकालीन वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे, जे भगवान शिवाला समर्पित आहे.

Sinnar | google

औद्योगिक केंद्र

गोंदेश्वर मंदिर हे हेमाडपंती स्थापत्यशैलीचा एक भव्य नमुना आहे. मंदिरात तुम्हाला मंगलमय वातावरण अनुभवता येते. सिन्नर हे एक प्रमुख औद्योगिक केंद्र आहे.

money | yandex

निसर्ग सौंदर्य

सिन्नर येथे प्रसिद्ध 'सिन्नर पवनचक्की प्रकल्प' आहे. तुम्ही सुट्टीत सिन्नरला पिकनिक प्लान करा. येथील सौंदर्य कायम तुमच्या मनात राहील. शांत, डोंगराळ , शेतीप्रधान निसर्गसौंदर्य यांचा सुरेख संगम अनुभवायला मिळतो.

Nashik | google

कसं जालं?

मुंबईहून ट्रेनने नाशिकला जा. त्यानंतर नाशिकवरून तुम्ही रिक्षाने किंवा बसने सिन्नर येथे जाऊ शकता. वन डे पिकनिकसाठी हे खास लोकेशन आहे.

Nashik Tourism | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

picnic

NEXT : सूर्यास्ताचा नजारा अन् कोकण प्रदेशाचे सुंदर दृश्य, 'येथे' अनुभवता येतो ट्रेकिंगचा थरार

Maharashtra Tourism | saam tv
येथे क्लिक करा...