Shreya Maskar
अहमदनगर / अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात वसलेल्या ऐतिहासिक हरिश्चंद्रगडावर प्रसिद्ध कोकणकडा स्थित आहे. हा थरारक ट्रेकिंग स्पॉट आहे.
कोकणकडा पावसाळ्यात आणि हिवाळ्यात धुक्याने वेढलेला दिसतो. कोकणकडा 'रिव्हर्स वॉटरफॉल' (उलटा धबधबा) साठी अत्यंत प्रसिद्ध आहेत. आयुष्यात एकदा तरी उलटा धबधबा पाहा.
जोरदार वाऱ्यामुळे धबधब्याचे पाणी खाली पडण्याऐवजी वरच्या दिशेने फेकले जाते. हा एक अनोखा अनुभव आहे. हा निसर्ग चमत्कार पाहायला परदेशी पर्यटक येथे आवर्जून येतात.
कोकणकड्यावरून सूर्यास्ताचा अतिशय मोहक आणि विहंगम नजारा पाहता येतो. हा कडा कोब्राच्या फण्यासारखा सरळ उभा असून येथून खोल दरी आणि आजूबाजूच्या पर्वतरांगांचे दर्शन घडते.
कोकणकडा हा हरिश्चंद्रगड ट्रेकचा सर्वात आकर्षक भाग असून, साहसी पर्यटकांसाठी कॅम्पिंगसाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. मित्रांसोबत तुम्ही येथे जाऊ शकता. कोकण प्रदेशाचे सुंदर दृश्य दिसते.
कोकणकड्याच्या जवळ वसलेले हरिश्चंद्रेश्वर मंदिर ६ व्या शतकातील असून ते काळ्या पाषाणातील कोरीव कामाचा एक उत्कृष्ट नमुना आहे.येथे प्राचीन लेणी आणि केदारेश्वर गुहा पाहायला मिळतात.
कोकणकड्यावरील तारामती शिखरावरून ३६० अंशाचे दृश्य, केदारेश्वर गुहेतील गूढ पाण्याने वेढलेले शिवलिंग आणि प्राचीन मंदिरे पाहायला मिळते.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.