Shreya Maskar
सध्या शिमग्यासाठी लोक कोकणात जाताना दिसत आहे. तुम्ही कोकणात गेला असाल तर वेळागर बीच या सुंदर लोकेशनला नक्की भेट द्या. येथील सौंदर्य स्वर्गाहून सुंदर आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात शिरोडा येथे वेळागर बीच वसलेला आहे. कोकणातील हे सुंदर आणि Hidden पिकनिक स्पॉट आहे. तुम्ही येथे वन डे ट्रिप प्लान करू शकता.
वेळागर बीच हा पांढरी शुभ्र वाळू , निळे पाणी आणि नारळी-पोफळीच्या बागांमुळे 'पॅराडाईज बीच' म्हणून ओळखला जातो.
वेळागर बीच अत्यंत शांत स्वच्छ आणि कमी गर्दीचा किनारा असून निसर्गप्रेमींसाठी एक पर्वणी आहे. तुम्ही येथे बोटिंगचा आनंद घेऊ शकता.
समुद्रकिनाऱ्याच्या आजूबाजूला कोकणी जेवणाची चव चाखायला मिळेल. हिवाळ्यात आणि पावसाळ्यात येथे नक्की भेट द्या. येथे निसर्गाच्या सानिध्यात सुंदर फोटोशूट करता येते.
सावंतवाडी आणि कुडाळ स्टेशन वेळागर बीचजवळ आहे. तुम्ही स्टेशनला उतरून रिक्षाने, बसने येथे जाता येते. शिमग्याला कोकणात गर्दी पाहायला मिळते.
वेळागर बीचवर पॅरासेलिंगसह अनेक वॉटर स्पोर्ट्स पर्यटकांसाठी उपलब्ध आहेत. तुम्ही येथे मित्रमंडळींसोबत तुफान मजा-मस्ती करू शकता.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.