India Tourism : वैभवशाली राजमहालांचा इतिहास, 'या' अजिंक्य किल्ल्यावरून दिसते निळ्या शहराचे विहंगम दृश्य

Shreya Maskar

मेहरानगड किल्ला

मेहरानगड किल्ला हा भारतातील सर्वात मोठ्या, सर्वात भयानक आणि अजिंक्य १५ व्या शतकातील किल्ल्यांपैकी एक म्हणून प्रसिद्ध आहे. मेहरानगड किल्ला जोधपूरमध्ये आहे. शहरापासून सुमारे ४०० फूट उंचीवरील एका टेकडीवर उभा आहे.

Mehrangarh Fort | google

कोणी बांधला?

मेहरानगड किल्ला राठोड घराण्याचे शासक राव जोधा यांनी १४५९ मध्ये बांधायला सुरुवात केली. हा किल्ला लाल वाळूच्या दगडापासून बनलेला आहे.

Mehrangarh Fort | google

ब्लू सिटी

मेहरानगड किल्ल्यावरून 'ब्लू सिटी'चे सुंदर दृश्य दिसते. हे सौंदर्य पाहणे म्हणजे स्वर्ग सुखच आहे. तुम्ही येथे भन्नाट फोटोशूट करू शकता.हे ठिकाणे राजपुताना संस्कृती आणि कलाकुसरीचे उत्तम नमुने आहेत.

Mehrangarh Fort | google

किल्ल्याचे वैशिष्ट्ये

मेहरानगड किल्ल्याची उंची १२० मीटरपेक्षा जास्त आहे. मेहरानगड किल्ला दिल्लीच्या कुतुबमिनारपेक्षा नक्कीच उंच आहे. इतिहासातील ही सर्वात महत्त्वाची वास्तू आहे.

Mehrangarh Fort | google

राजवाड्यांसाठी प्रसिद्ध

मेहरानगड किल्ला आपल्या अंतर्गत राजवाड्यांसाठी प्रसिद्ध आहे. यामध्ये महाराजा सूर सिंग यांनी बांधलेला सर्वात मोठा 'मोती महाल', सोन्याच्या चित्रांनी सजलेला 'फूल महाल', उत्कृष्ट काचेचे काम असलेला 'शीश महाल' आणि चोकेलाओ महाल हे मुख्य आकर्षण आहेत.

Mehrangarh Fort | google

दरवाजे-संग्रहालय

जोधपूरमधील ऐतिहासिक मेहरानगड किल्ला त्याच्या सात भव्य आणि ऐतिहासिक प्रवेशद्वारांसाठी (पोळ) प्रसिद्ध आहे. मेहरानगड किल्ल्यात एक अत्यंत समृद्ध संग्रहालय आहे.

Mehrangarh Fort | google

जोधपूर पर्यटन स्थळे

जोधपूरला उम्मेद भवन पॅलेस , जसवंत थाडा, राव जोधा डेझर्ट रॉक पार्क, कायलाना तलाव, तुर्जी का झालरा ही ठिकाणे आहेत. येथे नक्की भेट द्या.

Mehrangarh Fort | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Mehrangarh Fort | google

NEXT : किल्ले, राजवाडे, वाळवंट अन् संस्कृतीने नटलेली भूमी; राजस्थानला अनुभवा राजेशाही थाट, 'ही' ठिकाणे पाहायला विसरू नका

Rajasthan Tourism | yandex
येथे क्लिक करा...