Shreya Maskar
सुट्ट्यांमध्ये राजस्थानची सफर करा. राजस्थानला 'राजांची भूमी' म्हणून ओळखले जाते. येथे भव्य किल्ले, आलिशान राजवाडे, चैतन्यशील संस्कृती आणि विशाल थार वाळवंटासाठी जगप्रसिद्ध आहे.
राजस्थान जयपूर (गुलाबी), उदयपूर (तलावांचे शहर), जैसलमेर (सुवर्ण शहर) आणि जोधपूर (निळा) सारख्या रंगीत शहरांसाठी प्रसिद्ध आहे. परदेशी पर्यटकही येथे आवर्जून येतात.
राजेशाही वास्तुकला, गुंतागुंतीच्या हस्तकला, रत्नांचे दागिने आणि पारंपारिक पाककृती येथे पाहायला मिळतात. तुम्ही येथे राजेशाही थाटात सुंदर फोटोशूट करू शकता.
राजस्थानमध्ये अंबर पॅलेस, हवा महल, जोधपूरचा भव्य मेहरानगड किल्ला आणि उदयपूरचा शांत पिछोला तलाव पर्यटकांचे मुख्य आकर्षण आहेत. तसेच थार वाळवंट, रणथंबोर नॅशनल पार्क पाहायला नक्की जा.
जैसलमेरमध्ये ऑक्टोबर ते मार्च दरम्यान थार वाळवंटात उंटावरून फिरणे आणि सोनेरी वाळूच्या ढिगाऱ्यावर रात्रभर कॅम्पिंग करणे हा एक अनोखा अनुभव आहे.
उदयपूरला 'तलावांचे शहर' म्हणून ओळखले जाते, कारण हे शहर अनेक नैसर्गिक आणि मानवनिर्मित तलावांनी वेढलेले आहे. ज्यामध्ये पिचोला तलाव आणि फतेह सागर तलाव हे प्रमुख आहेत.
राजस्थानला भेट देण्यासाठी ऑक्टोबर ते मार्च हा हिवाळ्याचा काळ सर्वोत्तम मानला जातो. या काळात आल्हाददायक वातावरण अनुभवता येते.
वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.