Shreya Maskar
सिंधुदुर्ग जिल्ह्यात, विशेषतः मालवण तालुक्यात, प्रसिद्ध धामापूर तलाव वसलेला आहे. कोकणात विरंगुळ्यासाठी हे बेस्ट ठिकाण आहे.
धामापूर तलाव सोळाव्या शतकात बांधलेला कृत्रिम तलाव आहे. धामापूर तलावाला गेल्यावर इको-ट्रेकिंग आणि पक्षी निरीक्षण करता येते.
धामापूर तलाव त्याच्या स्वच्छ, नितळ पाण्यामुळे आणि आजूबाजूच्या हिरव्यागार निसर्गरम्य परिसरामुळे खूप प्रसिद्ध आहे.
धामापूर तलाव विजयनगर साम्राज्यातील मांडलिक नागेश देसाई यांनी बांधल्याचे बोले जाते. तसेच तलावाच्या आजूबाजूला घनदाट झाडी (आंबा, नारळ) आणि डोंगर पाहायला मिळतात.
धामापूर तलावात बोटिंग आणि काही प्रमाणात जलक्रीडांचा आनंद घेता येतो. तुम्ही येथे वन डे ट्रिप करू शकता. मित्रमंडळी, फॅमिलीसोबत येथे नक्की जा.
धामापूर तलाव कुडाळ आणि तारकर्लीच्या जवळ आहे. धामापूर तलावाच्या जवळ भगवती देवीचे मंदिरही आहे, जे कुडाळ-मालवण मार्गावर असून तलावाच्या सौंदर्यात भर घालते.
जोडीदारासोबत तलावाकाठी बसून तुम्ही निवांत वेळ घालवू शकता. तसेच येथील निसर्ग सौंदर्यात फोटोशूटचा आनंद घ्या.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. वरील माहितीला विकिपीडियाचा संदर्भ आहे.