Parbhani News : मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; परभणीच्या जिंतूर तालुक्यातील घटना

Parbhani News : मागील वर्ष- दीड वर्षांपासून हा लढा सुरु असून आरक्षणासाठी राज्यात अनेकांनी जीवनयात्रा संपविली आहे
Parbhani News
Parbhani NewsSaam tv
Published On

परभणी : राज्यात मराठा आरक्षणाचा लढा अजूनही थांबलेला नाही. दरम्यान विधानसभेसाठी झालेल्या मतदानात मराठा आरक्षणाला विरोध असल्याचे कारण सांगत जिंतूरमध्ये एका तरुणाने गळफास घेत जीवनयात्रा संपविली आहे. 

विधानसभा निवडणूक झाली असून याचा अद्याप निकाल यायचा बाकी आहे. निकाल लागल्यानंतर राज्यात सत्ता कोणाची येणार हे निश्चित होणार असून यानंतर देखील मराठा समाजाचा आरक्षणासाठी (Maratha Aarkshan) लढा सुरु राहणार असल्याची शक्यता आहे. दरम्यान मागील वर्ष- दीड वर्षांपासून हा लढा सुरु असून आरक्षणासाठी राज्यात अनेकांनी जीवनयात्रा संपविली आहे. पुन्हा एकदा एकाने आत्महत्या केल्याचे जिंतूर तालुक्यात समोर आले आहे. 

Parbhani News
Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

परभणीच्या (Parbhani News) जिंतूर तालुक्यातील सोस येथील विनायक शिंदे (वय ३०) या तरुणाने आरक्षणासाठी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना समोर आली. विनायक शिंदे याने आत्महतत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहलेली आढळून आली आहे. यात कालच्या मतदानाचा मराठा आरक्षणाचा विरोध केल्याने मी आत्महत्या करत आहे, याला मी स्वतः जबाबदार आहे; असा मजकूर लिहून आत्महत्या केली आहे. या घटनेची नोंद चारठाणा पोलिसात करण्यात असून पोलीस पुढील तपस करत आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com