Shreya Maskar
रश्मिका आणि विजय 26 फेब्रुवारीला उदयपूरमध्ये लग्न बंधनात अडकले. त्यांच्या लग्नाचे रिसेप्शन 4 मार्च 2026ला हैदराबादमध्ये थाटामाटात पार पडले.'विरोश'ने ऑक्टोबर 2025 मध्ये हैदराबादमध्ये साखरपुडा केला.
रश्मिका- विजयचा हळदी समारंभ 25 फेब्रुवारी 2026 ला उदयपूरमध्ये थाटामाटात पार पडला. हळदीचे फोटो रश्मिका- विजयने सोशल मीडियावर शेअर केले आहे. त्यांच्या फोटोंवर चाहते आणि कलाकारांनी प्रेमाचा वर्षाव केला आहे.
रश्मिका- विजयचा हळदी समारंभ त्यांचे कुटुंबिय, जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळींमध्ये पार पडला. सर्वजण आनंदाने नाचताना दिसत आहे. दोघांच्या कुटुंबाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.
रश्मिकाने हळदी समारंभासाठी हिरव्या रंगाचा ऑफ शोल्डर टॉप आणि सुंदर स्कर्ट परिधान केला होता. तिच्या ड्रेसवरील नक्षीकाम खूपच सुंदर होते. तिच्या ज्वेलरीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. गोल्डन ज्वेलरी तिने परिधान केली होती.
विजयने हळदीसाठी ऑफ व्हाइट रंगाचा कुर्ता-पायजमा परिधान केला होता. डोळ्यावर गॉगल घालून विजय खूप डॅशिंग दिसत होता.
विजय-रश्मिकाला हळद लावताना फोटोंमध्ये दिसत आहे. तसेच त्यांच्यावर रंगीबेरंगी फुलांचा वर्षाव झाला. दोघांनी होळी खेळली. फोंटोमध्ये दोघेही हिरव्या, पिवळ्या आणि गुलाबी रंगात माखलेले दिसत आहे.
हळदींच्या फोटोंमध्ये रश्मिका- विजयचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. दोघे एकत्र खूप आनंदी आणि क्यूट दिसत आहे. रश्मिका- विजय हे साऊथ इंडस्ट्रीचे पावर कपल आहे.
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने तेलुगू हिंदू आण कोडावा अशा दोन वेगवेगळ्या पद्धतीने लग्न केले. दोघे आता लवकरच 'राणाबली' (Ranabaali ) चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.