Amruta Khanvilkar : नऊवारी पैठणी, हातात हिरवा चुडा अन्...; नव्या नवरीसारखी नटली अमृता खानविलकर, फोटोवरून नजर हटणार नाही

Shreya Maskar

अमृता खानविलकर

महाराष्ट्राची चंद्रा अमृता खानविलकर कायम आपले चित्रपट, डान्स यामुळे चर्चेत असते. तिने मराठीसोबतच हिंदी इंडस्ट्री देखील गाजवली आहे. अलिकडेच ती 'तस्करी' या वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे.

Amruta Khanvilkar | instagram

नऊवारी पैठणी

अमृताने सुंदर पिवळ्या रंगाची नऊवारी पैठणी नेसली आहे. त्यावर मॅचिंगल ब्लाउज परिधान केलाय. तिने या साडीत सुंदर फोटोशूट केले आहे, ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Amruta Khanvilkar | instagram

मराठमोळा साज श्रृंगार

साडीला शोभेल असा मराठमोळा साज श्रृंगार अमृताने केला आहे. केसांचा अंबाडा घालून त्यात सुंदर गुलाबाची फुलं माळली आहेत.

Amruta Khanvilkar | instagram

कपाळावर मुंडावळ्या

गळ्यात गोल्डन ज्वेलरी, हातात हिरवा चुडा, पायात पैजण, नाकात नथ आणि कपाळावर मुंडावळ्या बांधून तिने हा लूक पूर्ण केला आहे.

Amruta Khanvilkar | instagram

नवी नवरी नटली

अमृता खानविलकर नव्या नवरीसारखी नटली आहे. ग्लॉसी मेकअपने तिचे सौंदर्य आणखी खुलवलं. तिच्या चेहऱ्यावरील हास्य पाहून चाहते घायाळ झाले आहेत.

Amruta Khanvilkar | instagram

चाहत्यांच्या कमेंट्स

अमृताच्या या फोटोंवर चाहते भरभरून कमेंट्स करत आहेत. "खूप सुंदर", "अप्रतिम मॅडम जी", "ब्यूटीफुल अमृता", "सुरेख अन् देखणी", "खूप प्रेम अमृता", "तुम्हाला सगळे रंग शोभतात, किती सुंदर दिसतेस..."

Amruta Khanvilkar | instagram

बिझनेसवुमन

अमृता खानविलकर आता बिझनेसवुमन झाली आहे. नुकताच अमृताचा 'अमुल्य बाय अमृता' साड्यांचा ब्रँड सुरू झाला आहे.

Amruta Khanvilkar | instagram

नाटक

अमृता खानविलकर सध्या 'लग्नपंचमी' या मराठी नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. यात तिच्यासोबत मराठी अभिनेता स्वप्निल जोशी झळकला आहे.

Amruta Khanvilkar | instagram

NEXT :  'सूर्यवंशम' मधील हीरा ठाकुरचा मुलगा आता कसा दिसतोय? इंडस्ट्रीत कमावलं मोठं नाव, पाहा फोटो

Sooryavansham | saam tv
येथे क्लिक करा...