Shreya Maskar
1999 साली रिलीज झालेला 'सूर्यवंशम' चित्रपट आजही खूप गाजतो. आजही हीरा ठाकूरचा हा चित्रपट लोकांमध्ये आवडता आहे.
'सूर्यवंशम' चित्रपटात अमिताभ बच्चन यांनी दुहेरी भूमिका साकारली. ठाकूर भानू प्रताप सिंग यांच्यासारखेच त्यांनी हीरा भानू प्रताप यांच्या साधेपणाने प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले.
'सूर्यवंशम' चित्रपटाचे हिरो अमिताभ बच्चन 83 व्या टिव्ही आणि सिनेमात सक्रिय आहेत. त्यांच्या 'कल्की २८९८ एडी' चित्रपटाचे आजही खूप कौतुक होते.
'सूर्यवंशम'ची मुख्य अभिनेत्री सौंदर्या (राधा ) आता आपल्यात नाही. वयाच्या 31 व्या वर्षी विमान अपघातात तिचे निधन झाले. सूर्यवंशम हा तिचा एकमेव हिंदी चित्रपट होता. ती साऊथ इंडस्ट्रीत खूप प्रसिद्ध होती.
अभिनेता आनंद वर्धन यांनी हिरालालचा मुलगा सोनूची भूमिका केली होती. बालकलाकार आनंद यांचे त्यांच्या कामाबद्दल चांगलेच कौतुक झाले. आता हा बाल कलाकार मोठा झाला आहे.
आनंद वर्धन हे दक्षिण भारतीय चित्रपटसृष्टीत काम करत आहेत. त्यांनी 'प्रियारागालू' चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली.
गावातील एक अत्यंत आदरणीय सरपंच ठाकूर भानुप्रताप, त्यांचा धाकटा मुलगा हीरा याला अपयशी मानतो आणि त्याच्याशी अत्यंत वाईट वागतो. मात्र हा हीरा भविष्यात चमकतो.
'सूर्यवंशम' चित्रपटात तगडी स्टारकास्ट पाहायला मिळाली. अमिताभ बच्चन, सौंदर्या आणि आनंद वर्धनसोबत मुकेश ऋषी, अनुपम खेर, कादर खान, शिवाजी साटम, बिंदू , राजेश खट्टर