Maratha Reservation  Saam TV
महाराष्ट्र

Maratha Reservation: जरांगेंचा डाव, सरकारची कोंडी! देशभरात रामलल्लाचा जयघोष अन् राज्यात मराठा आंदोलन तापणार

Maratha Aarkshan: २० जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याची मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. जरांगेंच्या या अल्टिमेटममुळे भाजपसह राज्यसरकारची चांगलीच कोंडी झाली आहे.

डॉ. माधव सावरगावे

Maratha Reservation Protest:

शनिवारी बीडमध्ये झालेल्या इशारा सभेतून मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणावरुन सरकारला अल्टिमेटम दिला आहे. २० जानेवारीपासून मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार असल्याची मोठी घोषणा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. जरांगेंच्या या अल्टिमेटममुळे भाजपसह राज्यसरकारची चांगलीच कोंडी झाली आहे. कारण एकीकडे देशभरात २२ जानेवारीला होणाऱ्या राममंदिर उद्घाटनाचा उत्साह असतानाच राज्यात मात्र मराठा आरक्षणाचा भडका पाहायला मिळणार आहे.

जरांगेंच्या अल्टिमेटमने सरकारची कोंडी...

मनोज जरांगे पाटील (Manoj jarange Patil) यांनी आरक्षणावरून सरकारची चांगलीच कोंडी केली आहे. बीडच्या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी २० जानेवारीपासून मुंबईत उपोषण करण्याचा इशारा दिल्यानंतर सरकारच्या अडचणी वाढल्या आहेत. कारण देशभरात २२ जानेवारीच्या राममंदिर उद्घाटन सोहळ्याचा जल्लोष असणार आहे. त्यावेळी देशभर दिवाळी साजरी केली जाईल आणि महाराष्ट्रात मात्र मराठा आरक्षणाचा (Maratha Aarkshan) भडका उडाल्याचे चित्र दिसेल.

राममंदिराच्या उद्घाटनानंतर (Ram Mandir) देशभरात भक्तीमय वातावरण होणार आहे. जवळपास महिना ते दीड महिना राम मंदिर उद्घाटन सोहळ्याचा जल्लोष साजरा होईल, त्यानंतर काही दिवसात लोकसभेची आचारसंहिता लागेल अशी शक्यता आहे. त्यामुळे हे आंदोलन थांबवण्यासाठी सरकारला काहीतरी तोडगा काढावा लागणार आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

भाजपची डोकेदुखी वाढणार?

दरम्यान, राम मंदिर उद्घाटन सोहळ्यानिमित्त भाजपकडून (BJP) अनेक कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले आहे. या काळात महाराष्ट्रामध्ये आंदोलनाची धग असणं हे सरकार तसेच भाजप साठी अडचणीचे ठरेल. त्यामुळे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर ठोस निर्णय सरकारला घ्यावाच लागणार आहे. दरम्यान, सरकारची कोंडी करण्यासाठीच जरांगे पाटील यांनी 20 जानेवारीची तारीख निवड केल्याचीही चर्चा सध्या सुरू आहे. (Latest Marathi News)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election: महाराष्ट्रात पैशांची ढगफुटी; निवडणुकीत शेकडो कोटीचा धुरळा

Assembly Election: बारामती नको,शिरुर हवं; स्वत:अजित पवारांनीच केला खुलासा

Maharashtra Election: महायुतीसाठी RSSचे स्पेशल 65; मविआची प्रत्येक चाल ठरवणार फोल?

Maharashtra Election : भाजपचा नारा, काँग्रेसचं उत्तर; बटेंगेचं फावणार की जुडेंगे जिंकणार? पाहा स्पेशल रिपोर्ट

Ajit Pawar : 'बारामतीतून उभं राहणार नव्हतो, तर....'; भरसभेत अजित पवारांचा मोठा खुलासा, VIDEO

SCROLL FOR NEXT