Earthquake in Taiwan : तैवान २ शक्तीशाली भूकंपांनी हादरला, ६.३ तीव्रतेचे धक्के; नागरिकांची पळापळ

Earthquake in Taiwan : भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 इतकी नोंदवण्यात आली असून ती खूप जास्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भूकंप एकदा नव्हे तर दोनदा झाला.
Earthquake In Himalayas
Earthquake In HimalayasSaam Digital
Published On

Earthquake in Taiwan :

तैवानमध्ये पुन्हा एकदा भूकंपाच्या जोरदार धक्क्यांना हादरला आहे. नागरिकांमध्ये या भूकंपामुळे भीतीचं वातावरण आहे. भूकंपाची तीव्रता खूप जास्त असली तरी कुठूनही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. तैवानमध्ये लागोपाठ दोनदा भूकंपाचे झटके जाणवल्याचे सांगण्यात येत आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

तैवानमध्ये रविवारी पहाटे अचानक भूकंपाचे धक्के जाणवले. त्यानंतर लोक कुटुंबासह बाहेर पळाल्याचं दिसून आलं. लोकांची मोकळ्या जागी पोहोचण्यासाठी धावपळ सुरु होती. भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 इतकी नोंदवण्यात आली असून ती खूप जास्त आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, भूकंप एकदा नव्हे तर दोनदा झाला. (Latest Marathi News)

Earthquake In Himalayas
Drone Attack: गुजरातजवळ अरबी समुद्रात भारतीय जहाजावर ड्रोन हल्ला

जर्मन रिसर्च सेंटर फॉर जिओसाइन्सेस (जेएफझेड) च्या हवाल्याने वृत्तसंस्था रॉयटर्सने वृत्त दिले आहे की, रविवारी पहाटे भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. त्याचे केंद्र 10 किलोमीटर (6.21 मैल) खोलीवर होते. भूकंपाची तीव्रता 6.3 रिश्टर स्केल एवढी मोजली गेली. मात्र या भूकंपामुळे तैवानमध्ये काही नुकसान झाले आहे की नाही याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.

Earthquake In Himalayas
Hyderabad Fire: हैदराबादमध्ये अग्नितांडव! रुग्णालयाच्या इमारतीला भीषण आग; अनेक रुग्ण अडकल्याची शक्यता, Live Video आला समोर

याआधीही हादरला तैवान

याआधीही 18 सप्टेंबरला तैवानमध्ये भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले होते. त्या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 6.3 इतकी मोजली गेली होती. त्यावेळीही तैवानला भूकंपामुळे कोणतीही हानी झाली नव्हती. अशा परिस्थितीत यावेळी देखील भूकंपामुळे तैवानला कोणतीही हानी होणार नाही, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com