Hyderabad Fire: हैदराबादमध्ये अग्नितांडव! रुग्णालयाच्या इमारतीला भीषण आग; अनेक रुग्ण अडकल्याची शक्यता, Live Video आला समोर

Hyderabad hospital Massive Fire: हैदराबादमध्ये लागलेल्या रुग्णालयाच्या इमारतीला लागलेल्या आगीत अनेक रुग्ण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. इमारतीला लागलेल्या आगीचा लाईव्ह व्हिडिओ समोर आला आहे.
Hyderabad hospital Fire
Hyderabad hospital FireSaam tv
Published On

hyderabad hospital Fire:

हैदराबादमधून एक धक्कादायक वृत्त हाती आली आहे. हैदराबादमध्ये शनिवरी एका रुग्णालयाच्या इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीमुळे इमारतीत अनेक रुग्ण अडकल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. इमारतीला लागलेल्या आगीचा लाईव्ह व्हिडिओ समोर आला आहे. (Latest Marathi News)

हैदराबादमधील अंकुरा रुग्णालयाला आग लागल्याची घटना घडली आहे. अंकुरा रुग्णालय इमारतीच्या पाचव्या मजल्याला ही आग लागली. इमारतीला आग लागल्यानंतर अग्निशमन दलाची अग्निबंब घटनास्थळी पोहोचले आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इमारतीला शॉर्ट सर्किटमुळे आगल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. इमारतीची पाचव्या मजल्याची आग ही १० व्या मजल्यापर्यंत पोहोचली. अंकुरा रुग्णालयात लहान मुले आणि गरोदर महिलांवर उपचार केले जातात. त्यामुळे या रुग्णालयात सर्वाधिक गरोदर महिला आहेत. रुग्णालयाच्या इमारतीतून सर्व गरोदर महिला आणि लहान मुलांना बाहेर काढण्यात आलं का, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती हाती आलेली नाही.

Hyderabad hospital Fire
Delhi Crime : मोमोज खाताना खांद्याला हात लागला म्हणून मुलाला संपवलं, CCTV मुळं नेमकी घटना झाली उघड

रुग्णालयाच्या इमारतीच्या गच्चीवर काही नर्स असल्याची माहिती हाती आली आहे. मात्र, त्या नर्स सुरक्षित आहे की नाही, याबाबत कोणत्याही प्रकारची माहिती हाती आलेली नाही.

आग लागल्यानंतर घटनास्थळी अग्निशमन दलाचे तीन अग्निबंब घटनास्थळी पोहोचले आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढण्याच यश मिळाल्याचं सांगण्यात आलं आहे. या आगीत रुग्णालयात मोठा जळून खाक झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com