Drone Attack: गुजरातजवळ अरबी समुद्रात भारतीय जहाजावर ड्रोन हल्ला

Gujarat News: गुजरातजवळ अरबी समुद्रात एका जहाजावर ड्रोन हल्ल्यामुळे स्फोट होऊन आग लागल्याची बातमी समोर येत आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही.
प्रातिनिधिक फोटो
प्रातिनिधिक फोटो Saam Tv
Published On

Drone attack on Indian ship in Arabian sea near Gujarat:

गुजरातजवळ अरबी समुद्रात एका जहाजावर ड्रोन हल्ल्यामुळे स्फोट होऊन आग लागल्याची बातमी समोर येत आहे. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, जहाजाच्या क्रूमध्ये 20 भारतीयांचा समावेश आहे. हे व्यापारी जहाज असल्याचं सांगितलं जात आहे. हे जहाज पोरबंदर किनार्‍यापासून 217 नॉटिकल मैल दूर आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कच्च्या तेलाची वाहतूक करणारे हे जहाज सौदी अरेबियातील बंदरातून निघून मंगळुरूच्या दिशेने निघाले होते. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

प्रातिनिधिक फोटो
Maratha Morcha in Mumbai: मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा ठरली, मनोज जरांगे २० जानेवारीला मुंबईत धडकणार, उपोषणाला बसणार

संरक्षण अधिकार्‍यांनी सांगितले की, भारतीय समुद्री क्षेत्रामध्ये गस्त घालत असलेल्या कोस्ट गार्ड जहाज ICGS विक्रमला संकटात सापडलेल्या व्यापारी जहाजाकडे जाण्याची सूचना देण्यात आली होती. तटरक्षक जहाजाने या भागातील सर्व जहाजांना मदतीसाठी बोलवलं आहे.  (Latest Marathi News)

एएनआयच्या वृत्तानुसार, जहाजाला लागलेली आग विझवण्यात आली असली तरी त्याचा परिणाम जहाजाच्या कामकाजावर झाला आहे. सर्व क्रू मेंबर्स सुरक्षित आहेत.

प्रातिनिधिक फोटो
Beed Jarange Sabha: एकदा काय मोठा समुदाय खवळला तर...; मुदत संपण्याआधीच जरांगेंचा सरकारला गंभीर इशारा

दरम्यान, सोमवारी भारतीय नौदलाने अपहरण झालेल्या माल्टा मालवाहू जहाजातून जखमी खलाशाला बाहेर काढण्यात मदत केली होती. त्यानंतर काही दिवसांनी ही घटना घडली आहे. अरबी समुद्रात एमव्ही रौन या जहाजावर बेकायदेशीरपणे समुद्री डाकू चढले होते, अशी माहिती मिळाली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com