Maratha Morcha in Mumbai: मराठा आरक्षण आंदोलनाची दिशा ठरली, मनोज जरांगे २० जानेवारीला मुंबईत धडकणार, उपोषणाला बसणार

Manoj Jarange Patil: आरक्षणाच्या मागणीसाठी आता मराठा मोर्चा थेट मुंबईत दाखल होणार आहे, अशी घोषणा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. बीड येथे आयोजित इशारा सभेत त्यांनी ही माहिती दिली आहे.
Manoj Jarange Patil Hunger Strike in Mumbai
Manoj Jarange Patil Hunger Strike in MumbaiSaam Tv
Published On

Manoj Jarange Patil Hunger Strike in Mumbai:

आरक्षणाच्या मागणीसाठी आता मराठा मोर्चा थेट मुंबईत दाखल होणार आहे, अशी घोषणा मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. बीड येथे आयोजित इशारा सभेत त्यांनी ही माहिती दिली आहे. ते म्हणाले आहेत की, 20 जानेवारीला मराठा मोर्चा मुंबईत दाखल होणार. त्यांनी मुंबईत आमरण उपोषण करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

काय म्हणाले जरांगे पाटील?

मनोज जरांगे पाटील म्हणाले म्हणाले आहेत की, 20 तारखेच्या आत जर आरक्षण दिलं नाही तर, मराठ्यांचं वादळ मुंबईच्या दिशेने निघणार. एकदा तिथे आल्यानंतर आरक्षण घेतल्याशिवाय माघारी फिरणार नसल्याचं ते म्हणाले आहेत.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Manoj Jarange Patil Hunger Strike in Mumbai
Beed Jarange Sabha: एकदा काय मोठा समुदाय खवळला तर...; मुदत संपण्याआधीच जरांगेंचा सरकारला गंभीर इशारा

मनोज जरांगे पाटील म्हणाले, आरक्षण पाहिजे, ''आता मोकळं माघारी येणार नाही. फक्त शांततेत जायचं आणि शांततेत यायचं. आपल्या पिकाला पाणी देऊन घ्या. घरची व्यवस्था नीट करा. अंतरवलीतून पायी मुंबईला हा मराठ्यांचा जनसागर जाणार.''  (Latest Marathi News)

'आता देव जरी आला तरी माघार नाही'

जरांगे म्हणाले, ''कुणीही मराठा आरक्षणाच्या मध्ये खोडा घालायच्या नाहीत. कोणत्याच पक्षांनी हस्तक्षेत करायचा नाही. कायद्याच्या आधीन राहून मराठा आरक्षणासाठी उपोषण सुरू राहणार.'' ते म्हणाले, जाहीर सांगतो, मराठे जर मुंबईकडे निघाले तर माघारी नाही फिरणार. आता देव जरी आला तरी माघार नाही.

Manoj Jarange Patil Hunger Strike in Mumbai
Medicine Scam: दारू घोटाळ्यानंतर दिल्लीत औषध घोटाळा? केजरीवाल सरकारची होणार CBI चौकशी

याआधी जरांगे म्हणाले की, ''आपल्या माणसाकडून कुठंही जाळपोळ होणार नाही, याची दक्षता घ्यायचीय. जर आपल्या पोराला अटक केली तर, पुऱ्या जिल्ह्यांनी उठायचं आणि त्या पोलीस ठाण्यात जायचं. 3 कोटी मराठा मुंबईला जाणार. यांच्यात अटक करण्याचा दम नाही.''

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com