Medicine Scam: दारू घोटाळ्यानंतर दिल्लीत औषध घोटाळा? केजरीवाल सरकारची होणार CBI चौकशी

Delhi Medicine Scam: केजरीवाल सरकारच्या अडचणी दिवसागणिक वाढताना दिसत आहेत. कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अनेक नेत्यांवर कारवाई झाल्यानंतर आता आणखी एका गंभीर प्रकरणात सीबीआय तपासाचे आदेश देण्यात आले आहेत.
 Delhi Medicine Scam
Delhi Medicine ScamSaam Tv
Published On

Delhi Medicine Scam:

केजरीवाल सरकारच्या अडचणी दिवसागणिक वाढताना दिसत आहेत. कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अनेक नेत्यांवर कारवाई झाल्यानंतर आता आणखी एका गंभीर प्रकरणात सीबीआय तपासाचे आदेश देण्यात आले आहेत. दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी हे आदेश दिले आहेत. हे प्रकरण सरकारी रुग्णालयातील औषध खरेदीशी संबंधित असून त्यात नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

दिल्लीच्या सरकारी रुग्णालयांसाठी खरेदी करण्यात आलेल्या औषधांमध्ये अनियमितता आढळून आल्यानंतर नायब राज्यपालांनी सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. या रुग्णालयांनी औषध खरेदीत निष्काळजीपणा केला असून सरकारी व खासगी प्रयोगशाळांमधील चाचणीत हे औषध निर्धारित मानकांची पूर्तता करण्यास ते कमी पडत असल्याचं सिद्ध झालं आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

 Delhi Medicine Scam
Maratha reservation Protest: बीडमधील ST बसेसच्या सर्व फेऱ्या रद्द; महामंडळाच्या निर्णयाने प्रवाशांचे हाल, कारण काय?

एएनआयच्या वृत्तानुसार, दिल्लीचे नायब राज्यपाल व्हीके सक्सेना यांनी दिल्लीच्या सरकारी रुग्णालयांमध्ये या औषधांबाबत दक्षता विभागाच्या अहवालावर सीबीआय चौकशीचे आदेश दिले आहेत. यासोबतच मुख्य सचिव नरेश कुमार यांना पत्र लिहून चौकशी करण्यास सांगितले आहे. (Latest Marathi News)

या औषधांची सरकारी आणि खासगी प्रयोगशाळांमध्ये चाचणी केली असता ती निर्धारित मानकांची पूर्तता करत नसल्याचे सांगण्यात येत आहे. यातच लोकसभा निवडणुकीपूर्वी केजरीवाल सरकार पुन्हा एकदा अडचणीत सापडल्याचे दिसत आहे.

 Delhi Medicine Scam
CCTV Footage : अडीच वर्षांच्या लेकीसह वडील खाडीत वाहून गेले; डोंबिवलीतील धक्कादायक घटना

दरम्यान, याआधीही दिल्लीतील कथित दारू घोटाळ्याप्रकरणी अनेक नेत्यांची चौकशी सुरू आहे. अलीकडेच उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि खासदार संजय सिंह यांच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्यात आली आहे. मनीष सिसोदिया यांच्या न्यायालयीन कोठडीत 19 जानेवारीपर्यंत तर संजय सिंह यांच्या न्यायालयीन कोठडीत 10 जानेवारीपर्यंत वाढ करण्यात आली आहे. अरविंद केजरीवाल यांनाही तिसऱ्यांदा समन्स पाठवण्यात आले आहे. यामध्ये त्यांना 3 जानेवारीला हजर राहण्यास सांगण्यात आले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com