CCTV Footage Dombivli News
CCTV Footage Dombivli NewsSaam TV

CCTV Footage : अडीच वर्षांच्या लेकीसह वडील खाडीत वाहून गेले; डोंबिवलीतील धक्कादायक घटना

Dombivli Accident: मुलगी खेळत होती, खेळत असताना ती खाडी किनारी गेली. अचानाक ती पाण्यात पडली. तिला पाहून बसलेले वयोवृद्ध वडील तिला वाचवण्यासाठी धावले.
Published on

अभिजित देशमुख

Dombivli:

डोंबिवलीत राजूनगर परिसरात अपघाताची एक मोठी घटना घडलीये. एक अडीच वर्षाची चिमुकली आणि तिचे वडील खाडीत बुडालेत. पोलिसांनी तसेच फायर ब्रिगेडने शोध मोहिम सुरू केली आहे. फायर ब्रिगेडचे कर्मचारी त्यांचा शोधत आहेत. तसेच दोघांची ओळख पटविण्यासाठी अधिक तपास सुरू आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

CCTV Footage Dombivli News
Dombivali News : रिंग रोडमध्ये बाधित शेतकऱ्यांना चार पट मोबदला द्या; युवा सेना सचिव दीपेश म्हात्रे यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मिळालेल्या अधिक माहितीनुसार, डोंबिवली पश्चिमेतील राजूनगर परिसरात खाडी किनारी एक व्यक्ती आपल्या अडीच वर्षाच्या मुलीसह आले होते. ती मुलगी खेळत होती, खेळत असताना ती खाडी किनारी गेली. अचानाक ती पाण्यात पडली. तिला पाहून तेथे असलेले तिचे बाबा तिला वाचवण्यासाठी पुढे धावले.

त्यांनी पाण्यात उडी मारली. या दोघांना पाहून चांद शेख नावाचा तरुण त्यांना वाचवण्यासाठी धावला. मात्र तोपर्यंत ते दोघेही बुडाले होते. काही अंतरावर चांद शेख यांनी त्या वडिलांचा हात पाहिला. मात्र तो त्यांना वाचवू शकला नाही. त्याने याबाबत माजी नगरसेवक विकास म्हात्रे यांना माहिती दिली.

घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच घटनेबात विष्णूनगर पोलिसांना याबाबत माहिती दिली. वरिष्ठ पोलिस निरिक्षक मोहन खंदारे त्यांच्या पोलिस पथकासोबत खाडी किनारी पोहचले. फायर ब्रिगेडच्या पथकही दाखल झाले आहेत. शोध मोहिम सुरु झाली आहे. हे दोघे कोण होते? ते कोठून आले? याचा तपास पोलीस करत आहेत. अत्यंत दुर्दैवी घटना घडल्याने परिसराता एकच खळबळ उडाली आहे.

CCTV Footage Dombivli News
Dombivali Crime: सराईत दोन साखळी चोरांना मानपाडा पोलिसांनी ठोकल्या बेड्या; सात लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com