(अभिजीत देशमुख)
मानपाडा पोलिसांनी दोन सराईत साखळी चोरांना अटक केलीय. पोलिसांनी या दोन्ही चोरांकडून सोन्याचे दागिने व मोटरसायकल असा सात लाख २२ हजारांचा मुद्देमाल जप्त केलाय.या दोघांविरोधात मानपाडा खांडेश्वर ,पनवेल ,रोहा पोलीस स्टेशनमध्ये साखळी चोरीचे गुन्हे दाखल आहेत.(Latest News)
अशी केली अटक
डोंबिवलीतील मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत विजय सेल्सच्या समोर एक साखळी चोरीची घटना घडली होती. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केला होता. कल्याणचे डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक होनमाने, पोलीस अधिकारी अविनाश वनवे, प्रशांत आंधळे, संपत फडोळ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. त्यावेळी पोलिसांच्या हाती चोरी घडलेल्या ठिकाणाचे सीसीटीव्ही हाती लागले.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
पोलिसांनी ते फुटेज तपासले आणि त्याच्या साहाय्याने ते आरोपींपर्यत पोहोचले. रायगड येथील मानगाव परिसरात हे चोर लपले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. माणगाव परिसरात सापळा रचत पोलिसांनी या दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेतलं. सुखवीर रावल आणि विरु राजपूत, अशी या चोरट्यांची नावे आहेत.
धक्कादायक म्हणजे सुखवीर हा पायाने अपंग आहे. तो बाईकवर मागे बसायचा. तर विरु हा बाईक चालवत असायचा. आपल्या दिव्यांग होण्याचा फायदा घेत सुखवीर नागरिकांच्या अंगावरील दागिने हिसकवत. त्यानंतर दोघेही बाईकवरुन पसार होत. या दोघांनी पाच शहरात धुमाकुळ घातला होता. त्यांच्याकडून पोलिसांनी सात लाख २२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केलाय.
१५ लाखांची वायर चोरी करणारे दोन सराईत चोरटे गजाआड
डोंबिवलीतील खोणी परिसरात सुरू असलेल्या म्हाडाच्या इमारतीत कॉपर वायर चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना मानपाडा पोलिसांनी अटक केलीय. चंदू शिंदे आणि भास्कर म्हाडीक अशी या चोरट्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून पोलिसांनी १५ लाखाची चोरी केलेली वायर हस्तगत केलीय.
खोणी गाव परिसरात म्हाडाच्या इमारतींचे बांधकाम चालू आहेत. काही दिवसांपूर्वी म्हाडाच्या १२ इमारतीतून कॉपर वायर चोरीला गेल्या. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. डीसीपी सचिन गुंजाळ, एसीपी कल्याणजी घेटे, वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक होनमाने यांच्या मार्गदर्शनाखाली अविनाश वनवे यांच्या तपास पथकाने तपास सुरु केला.
पोलीस कर्मचारी राजेंद्र खिल्लारे, दीपक गडगे, शांताराम कसबे, महेंद्र मांजा, रविंद्र हासे, अशोक आहेर या पोलिसांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचे वाहन शोधले. या वाहनाचा शोध घेतल्यानंतर हे वाहन पुणे शहराची असल्याचं समजलं. त्यानंतर पोलीस पथक पुण्यात पोहचले. पुण्यात जाऊन मिळालेल्या माहितीनुसार एका घरात छापा टाकला. त्यावेळी पोलिसांच्या हाती हे दोघेही चोरटे लागले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.