Gudi Padwa Speech: यंदाच्या गुढीपाडव्याला चिमुकल्यांना शिकवा हे सोपं भाषण, सोसायटीत होईल तुमच्याच मुलाची चर्चा

Gudi Padwa Speech For Kids: गुढीपाडव्याच्या निमित्ताने लहान मुलांसाठी सोपं आणि सुंदर भाषण. सोसायटी किंवा शाळेच्या कार्यक्रमात मुलांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी गुढीपाडव्याबद्दल सांगणारं हे छोटं भाषण नक्की शिकवा.
gudi padwa speech in marathi
gudi padwa speech for kidsgoogle
Published On

मार्च महिन्यात गुढीपाडव्या मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. या दिवशी प्रत्येक घरात गुढी उभारुन तीची पूजा केली जाते. हा भारतीय सण हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चैत्र शुद्ध प्रतिपदेला महाराष्ट्रात मोठ्या जल्लोषात साजरा केला जातो. घरात गोडाचं जेवण केलं जातं. तसेच या दिवशी सोसायटीत एक वेगळी मोठी गुढी उभारली जाते. या गुढीची पूजा केली जाते. सर्व सोसायटीतले लोक तिथे पारंपारिक पोषाखात हा दिवस एकत्र साजरा करतात.

काहीजण या दिवशी खास भाषण सुद्धा देतात. पण तुमच्योसोबत तुमच्या मुलांचाही आत्मविश्वास वाढवायचा असेल तर तुम्ही त्यांनाही यंदाच्या पाडव्याला भाषण द्यायला सांगू शकता. पुढे आपण लहान मुलांसाठी खास भाषण जाणून घेणार आहोत.

gudi padwa speech in marathi
Mens Health After 40: फक्त पुरुषांनाच होतात हे ४ जीवघेणे आजार, चाळिशीतल्या पुरुषांनी आत्ताच व्हा सावध

गुढीपाडवा भाषण

नमस्कार सगळ्यांना.

आज मी तुम्हाला गुढीपाडव्याच्या सणाबद्दल थोडेसे सांगणार आहे.

गुढीपाडवा हा महाराष्ट्रातील एक खूप महत्त्वाचा सण आहे. या दिवसापासून मराठी नववर्षाची सुरुवात होते. हा सण आनंद, उत्साह आणि नवीन सुरुवातीचे प्रतीक आहे. या दिवशी आपल्या घरासमोर गुढी उभारली जाते. गुढी म्हणजे विजय आणि यशाचे प्रतीक मानले जाते. गुढीवर सुंदर कापड, कडुलिंबाची पाने, साखरेच्या गाठी आणि फुलांचा हार लावला जातो.

गुढीपाडव्याच्या दिवशी लोक घर स्वच्छ करतात, रांगोळी काढतात आणि नवीन कपडे घालतात. कुटुंबातील सगळेजण एकत्र येऊन सण साजरा करतात. या दिवशी कडुलिंब आणि गूळ खाण्याचीही परंपरा आहे. याचा अर्थ असा की आयुष्यात गोड आणि कडू अनुभव येतात, पण आपण त्यांना आनंदाने स्वीकारायला शिकतो. गुढीपाडवा आपल्याला नवीन वर्षात चांगले काम करण्याची आणि सकारात्मक राहण्याची प्रेरणा देतो.

चला, आपण सर्वजण नवीन वर्षात चांगले अभ्यास करूया, मोठ्यांचा आदर करूया आणि सगळ्यांशी प्रेमाने वागूया.

आपणा सर्वांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा!

धन्यवाद!

gudi padwa speech in marathi
Water Drink Time: जेवल्यानंतर लगेच पाणी पिणं बरोबर आहे का? वाचा योग्य वेळ कोणती?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com