Sakshi Sunil Jadhav
शरीराला सक्रिय ठेवण्यासाठी पाणी खूप आवश्यक असतं. पाण्यामुळे शरीराला खूप फायदे मिळतात.
तुम्हाला जेव्हा पाणी पिण्याचं लक्षात राहत नाही, तेव्हा तुम्ही शरीर संकेत देतं. त्यामध्ये घसा कोरडा होतो किंवा उचकी लागते.
जेवणानंतर आपण पाणी आवर्जून पितो. त्यानेच आपल्याला जेवण पूर्ण झालय अशी भावना निर्माण होते.
बऱ्याचदा लोकांना याच्यात बाबतीत अनेक प्रश्न पडतात. त्यामध्ये जेवल्यावर किती वेळाने पाणी प्यायचं? किंवा लगेच पाणी प्यायलेलं चालतं का? हा प्रश्न पडतो.
मुळात जेवणानंतर तुम्ही थोडं पाणी प्यायलं पाहिजे. कारण तुम्ही खाल्लेलं अन्न हे व्यवस्थित पचन होतं. साधारण अर्धा ग्लास पाणी पुरेसं असतं.
तुम्ही पोटभर जेवल्यावर जर पोटभर पाणी पित असाल तर तुम्हाला पोटफुगी, अॅसिडीटी किंवा थोड्या वेळाने पुन्हा भूक लागणे अशा समस्येला सामोरं जावं लागू शकतं.
आयुर्वेदानुसार तुम्ही जेवणानंतर किमान १ तासानंतर पाणी पिणं योग्य ठरु शकतं. त्याने तुम्हाला इतर त्रासांना सामोरं जावं लागत नाही.
तुम्ही उशीरा पाणी पित असाल तर तुमचं जेवण व्यवस्थित पचन होतं. बद्धकोष्ठतेच्या त्रासालाही सामोरं जावं लागत नाही. गॅसची समस्या जाणवत नाही.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.