मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांनी सरकाराला गंभीर इशारा दिलाय. येत्या २० जानेवारीला मराठा आंदोलन मुंबई केलं जाईल. त्यासाठी ३ कोटी मराठा आंदोलक मुंबईत येतील असा दावा त्यांनी केलाय. जरांगे-पाटील यांच्या आक्रमक इशाऱ्यानंतर सरकारमधील नेत्यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. सरकार टिकणारं आरक्षण देणार आहे. (Latest News)
राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलाय. याचदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात क्युरेटिव्ह पिटीशन स्वीकारलेली आहे. येत्या २४ जानेवारीला यासंदर्भात निकाल येणार आहे. यावर राज्याच्या महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांना विचारले असता जी बाब न्यायालयात आहे, त्याबाबत अधिक भाष्य करणार नाही. मात्र कुणाच्याही आरक्षणाला धक्का न लागता मराठ्यांना कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण मिळावं, ही महायुती सरकारची भूमिका असल्याचे आदिती तटकरे म्हणाल्या.
('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे यांनी आक्रमक भूमिका घेतलीय. आरक्षणासाठी २० जानेवारीला ३ कोटी लोक मुंबईला धडकणार, असाच इशारा त्यांनी दिलाय. याबाबत बोलताना खासदार श्रीकांत शिंदेंनी मनोज जरांगे-पाटील यांनी ज्याप्रमाणे सरकारला सांगितलं त्याप्रमाणे सरकारने माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मराठा समाजाला आरक्षण कसे मिळेल.
जास्तीत जास्त कुणबी दाखले कसे मिळतील यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. त्याची प्रचिती म्हणजे ५४ लाख कुणबी दाखले आज आपण देऊ शकतो. हा खूप मोठा आकडा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वारंवार सांगतायत मराठा समाजाला टिकेल, असे आरक्षण दिले पाहिजे. कधी कोर्ट क्युरेटिव्ह पेटिशन स्वीकार करत नाही, मात्र यावेळी न्यायालयाने स्वीकारलीय.
त्यामधून मराठा समाजाने मागास कसा आहे, हे सिद्ध करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार आहे. मराठा समाजाला आरक्षण कसे मिळेल याच्यासाठी सरकार प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहे. जरांगे-पाटलांबरोबर देखील चर्चा सुरू आहे. येणाऱ्या काळात हा प्रश्न कृतीतून सोडवण्याचा भर सरकरचा असेल, असे श्रीकांत शिंदेंनी सांगितले.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.