Manoj Jarange News: क्युरेटिव्ह पीटिशनचं मराठा आरक्षण कोर्टात टिकणार का? मनोज जरांगे यांचा CM एकनाथ शिंदे यांना सवाल

Manoj Jarange Patil on curative petition: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्युरेटिव्ह पिटिशन याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली असल्याचं सांगत जरांगे यांना मुबंईत यायची गरज नसल्याचं म्हटलं.
Manoj Jarange Patil
Manoj Jarange PatilSaam TV
Published On

Manoj Jarange on Cm Eknath Shinde:

आज शनिवारी बीडमध्ये पाचव्या टप्प्यातील इशारा सभा पार पडली. या सभेत मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 20 जानेवारीला मुंबईत आरक्षणाच्या मागणीसाठी आझाद मैदानात आमरण उपोषणाला येत असल्याचा इशारा दिला आहे. त्यांच्या या इशाऱ्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी क्युरेटिव्ह पिटिशन याचिका सुप्रीम कोर्टात दाखल झाली असल्याचं सांगत जरांगे यांना मुबंईत यायची गरज नसल्याचं म्हटलं. त्यावर जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना क्युरेटिव्ह पिटिशनचं मराठा आरक्षण टिकणार का? असा सवाल केला. (Latest Marathi News)

मनोज जरांगे यांनी जालन्यात माध्यमांशी संवाद साधला. मनोज जरांगे क्युरेटिव्ह पिटीशनवर म्हणाले, 'आम्ही ते आरक्षण नाकारलं नाही. आम्ही तेही आरक्षण घ्यायला तयार आहोत. मात्र ते आरक्षण ओपन कोर्टात जाणार का? असा प्रति सवाल उपस्थित करत जर चेंबरमध्ये त्यांची हेरिंग झाली, टिकलं नाही तर ? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

Manoj Jarange Patil
Maratha Aarakshan : नाशिकमध्ये मराठा आंदोलक आक्रमक, छगन भुजबळ यांना दाखवले काळे झेंडे

'मराठ्यांमध्ये ओबीसींच्या 54 लाख नोंदी मिळाल्याने मराठा आणि कुणबी एकच असल्याचं सिद्ध झालं. त्यामुळे सरकारने कायदा परित करावा आणि मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं. मुंबईला यावं की नाही हा त्यांचा प्रश्न असल्याचं म्हटलं. आम्ही मुंबईला यायला तयार असल्याचा इशारा जरांगे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिला आहे.

'24 डिसेंबर ही अल्टीमेटमची तारीख असली तरी आम्हाला मुंबईला जायला तयारी करायला वेळ लागतो. त्यामुळे आम्ही मुंबईला 20 जानेवारीला जाणार आहोत. यावेळी आपण सरकारला वेळ दिला नसल्याचं म्हटलं आहे. सरकारला वेळ कशाला हवा? आम्हाला आंदोलनाच्या तयारी करायला वेळ लागतो, त्यामुळे 20 जानेवारी आंदोलनाची तारीख ठेवल्याचंही मनोज पाटील जरांगे यांनी म्हटलं आहे.

Manoj Jarange Patil
Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये मोठे बदल, महाराष्ट्राच्या प्रभारीपदी रमेश चेन्निथला यांची नियुक्ती

बीडच्या सभेतून जरांगे यांनी केलेल्या टीकेनंतर भुजबळ यांनी आपण कोल्हे-कोहिले यांना दाद देत नसल्याच म्हटलं. त्यानंतर जरांगे यांनीही कठोर शब्दात प्रत्युत्तर दिलं.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com