Maratha Aarakshan : नाशिकमध्ये मराठा आंदोलक आक्रमक, छगन भुजबळ यांना दाखवले काळे झेंडे

Maratha Andolan Latest News: नाशिकमध्ये मराठा आंदोलकांनी मंत्री छगन भुजबळ यांना एका धार्मिक कार्यक्रमांमध्ये काळे झेंडे दाखवल्याची घटना घडली आहे. नाशिकमध्ये स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली तपोवनमध्ये मोदी मैदानावर श्रीराम धर्मसंस्कार सोहळा सुरू आहे.
Maratha Andolan Latest News
Maratha Andolan Latest NewsSaam Tv
Published On

>> तबरेझ शेख

Maratha Andolan Latest News:

नाशिकमध्ये मराठा आंदोलकांनी मंत्री छगन भुजबळ यांना एका धार्मिक कार्यक्रमांमध्ये काळे झेंडे दाखवल्याची घटना घडली आहे. नाशिकमध्ये स्वामी शांतिगिरी महाराज यांच्या अध्यक्षतेखाली तपोवनमध्ये मोदी मैदानावर श्रीराम धर्मसंस्कार सोहळा सुरू आहे.

या सोहळ्यामध्ये राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांना निमंत्रित करण्यात आले होते. यावेळी छगन भुजबळ हे व्यासपीठावर येताच काही तरुणांनी मराठा आरक्षणावरून त्यांना काळे कपडे दाखवत निषेध नोंदवला आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Maratha Andolan Latest News
Samruddhi expressway accident : मुंबईहून नागपूरला जाणाऱ्या कारचा समृद्धीवर भीषण अपघात, वाहन चालकाचा जागीच मृत्यू

या अनुष्ठानाला येवला तालुक्यातील शेकडो युवक बसले असून येवला तालुक्याच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांनी छगन भुजबळ यांना या सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी विनंती केली होती. त्यानुसार आज छगन भुजबळ हे या धर्मसंस्कार सोहळ्याला उपस्थित होते.  (Latest Marathi News)

याचवेळी काही तरुणांनी भुजबळ यांना काळे कपडे दाखवत छगन भुजबळ हे मंचावर आले कसे, असा सवाल केला आहे. या धार्मिक कार्यक्रमात काळे झेंडे दाखवल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. तर एका तरुणाने मौनव्रत तोडून छगन भुजबळ यांच्या विरोध केला.

Maratha Andolan Latest News
Lok Sabha Election: लोकसभा निवडणुकीआधी काँग्रेसमध्ये मोठे बदल, महाराष्ट्राच्या प्रभारीपदी रमेश चेन्निथला यांची नियुक्ती

तपोवन आतील मोदी मैदानावर सुरू असणाऱ्या या धार्मिक कार्यक्रमात जातीपातीचा मुद्दा आल्यानं या कार्यक्रमाचे आयोजकांवरच संशय व्यक्त केला जातो आहे. दुसरीकडे शांतिगिरी महाराज हे देखील नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणुकीच्या रिंगणात उतरणारा असल्याची जोरदार चर्चा आहे. म्हणूनच हा कार्यक्रम शांतिगिरी महाराजांनी नाशिकमध्ये घेतल्याचे देखील बोलले जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com