Police and forensic teams investigate the house in Kanpur where a married woman was found dead in her bedroom after posting a mysterious WhatsApp status.
Police and forensic teams investigate the house in Kanpur where a married woman was found dead in her bedroom after posting a mysterious WhatsApp status.Saam Tv

आधी व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस – “हम जो फैसले करते हैं, खुलेआम करते हैं; काही तासांतच बेडरूममध्ये आढळला विवाहित महिलेचा मृतदेह

Kanpur Married Woman Mysterious Death Investigation: कानपूरमध्ये एका विवाहित महिलेचा बेडरूममध्ये संशयास्पद मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मृत्यूपूर्वी तिने व्हॉट्सअ‍ॅपवर टाकलेले स्टेटस चर्चेचा विषय ठरले आहे.
Published on

उत्तर प्रदेशातील कानपूरमध्ये एका विवाहित महिलेचा संशयास्पद परिस्थितीत मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. महिलेचा मृतदेह तिच्या बेडरूममध्ये बेडवर आढळला. तिच्या मृत्यूपूर्वी तिच्या व्हॉट्सअॅप स्टेटसवर एक मेसेज आला होता, "हम जो फैसले करते हैं, खुलेआम करते हैं।" या स्टेटसमुळे प्रकरणाला वेगळेच वळण लागले आहे. या घटनेनंतर महिलेच्या पालकांनी सासरच्या लोकांवर हत्येचा आरोप केला आहे, तर पोलिस या प्रकरणाची कसून चौकशी करत आहेत.

Police and forensic teams investigate the house in Kanpur where a married woman was found dead in her bedroom after posting a mysterious WhatsApp status.
Crime: १७ वर्षीय मुलाकडून ३ अल्पवयीन मुलींवर बलात्कार, व्हिडीओ काढून ब्लॅकमेल; १ पीडिता गरोदर

मिळालेल्या माहितीनुसार, विवाहित महिलेचे नाव सोनाली उर्फ ​​श्रद्धा असे होते, ती सध्या तिच्या सासरच्या लोकांसोबत राहत होती. सोनालीचे माहेरघर इटावा येथील भरथाना येथे आहे. कुटुंबातील सदस्यांच्या मते, ती तिच्या बेडरूममध्ये एकटी होती आणि अचानक तिचा मृतदेह बेडवर आढळला. तिच्या शरीरावर कुठेलही निशाण दिसले नाही. परंतु तपासात तिच्या मृत्यूची परिस्थिती संशयास्पद मानली जात आहे. तिच्या मृत्यूच्या काही काळापूर्वी, मृत महिलेने सोशल मीडियावर जे स्टेटस अपलोड केले होते, ते पाहून कुटुंबीय आणि पोलिस दोघेही हादरले.

Police and forensic teams investigate the house in Kanpur where a married woman was found dead in her bedroom after posting a mysterious WhatsApp status.
Accident News : दुर्दैवी! थांबलेल्या ट्रकला कारची जोरदार धडक, ३ पोलीस उपनिरीक्षकांचा जागीच मृत्यू, दोघे गंभीर

मृत महिलेच्या भावाने सांगितले की त्याच्या बहिणीचा तिच्या सासरच्या लोकांशी सतत वाद होत असायचे. त्याने सासरच्या लोकांवर हत्येचा आरोप करत म्हटले की ही आत्महत्या नसून पूर्वनियोजित हत्या असू शकते. भावाने सांगितले की बहिणीच्या लग्न झाल्यापासून यांच्यात सतत किरकोळ कारणावरून भांडण होत असायचे. अलीकडेच हे वाद वाढले आहेत. त्याने ताबडतोब पोलिसांना कळवले आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली.

Police and forensic teams investigate the house in Kanpur where a married woman was found dead in her bedroom after posting a mysterious WhatsApp status.
फार्महाऊसवर सुरू होती ड्रग पार्टी; माजी आमदार निघाला कोकिन टेस्ट पॉझिटिव्ह, राजकीय वर्तुळात खळबळ

घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी पोलिस पथक आणि फॉरेन्सिक टीमसह संपूर्ण घराची तपासणी केली. बेडरूम, आजूबाजूच्या खोल्या आणि इतर भागांची कसून तपासणी करण्यात आली. डीसीपींनी सांगितले की, मृताचा मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. ते म्हणाले, तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल केला जाईल आणि शवविच्छेदन अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. पोलिसांनी सासरच्या कुटुंबातील काही सदस्यांचीही चौकशी सुरू केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com