Amravati News: कैद्यांमध्ये जुंपली.. किरकोळ वादातून तुफान हाणामारी, अमरावती जिल्हा कारागृहातील धक्कादायक प्रकार

Amravati News: अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंदी असलेल्या दोन कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. फ्रेजरपुरा पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.
Amravati News
Amravati NewsSaamtv
Published On

अमर घटारे, अमरावती| ता. २४ डिसेंबर २०२३

Amravati Breaking News:

अमरावतीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अमरावतीच्या जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंदी असलेल्या दोन कैद्यांमध्ये जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली. या घटनेनंतर वरिष्ठ पोलिसांसह फ्रेजरपुरा पोलिसांचा ताफा कारागृहात दाखल झाला. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. (Crime News in Marathi)

याबाबत अधिक माहिती अशी की, अमरावतीच्या (Amravati) जिल्हा मध्यवर्ती कारागृहात बंदिस्त असलेल्या पुणे व अमरावती येथील दोन कैद्यांमध्ये काही कारणास्तव वाद झाला. या वादाचे रुपांतर भांडणात होऊन दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. या घटनेची माहिती मिळताच एसीपी कैलाश पुंडकर फ्रेजरपुराचे ठाणेदार गोरखनाथ जाधव यांच्यासह फौजफाट्यासह मध्यवर्ती कारागृहात पोहोचले.

या संपूर्ण प्रकरणाची कारागृह प्रशासनाकडून माहिती मिळवत सीसीटीव्ही फुटेजही (CCTV Footage) तपासण्यात आले. फ्रेजरपुरा पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत. दरम्यान, कैद्यांमध्येच मारामारीचे प्रकार घडल्याने कारागृह प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Amravati News
Manoj Jarange News: क्युरेटिव्ह पीटिशनचं मराठा आरक्षण कोर्टात टिकणार का? मनोज जरांगे यांचा CM एकनाथ शिंदे यांना सवाल

मद्यधुंद पोलिसांकडूनच वाहनांची तोडफोड..

लातूरच्या (Latur) औसा तालुक्यातील शिंदाळा येथिल एका सांस्कृतिक कला केंद्रावर चक्क पोलीस कर्मचाऱ्यांनी मद्यधुंद अवस्थेत गाड्यांची तोडफोड केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे. (Latest Marathi News)

Amravati News
Maratha Aarakshan : नाशिकमध्ये मराठा आंदोलक आक्रमक, छगन भुजबळ यांना दाखवले काळे झेंडे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com