Manoj Jarange Patil x
महाराष्ट्र

Manoj Jarange : फडणवीस सरकारला दोन दिवसांचा अल्टीमेटम, एकदा निघालो तर थांबणार नाही; मनोज जरांगेंची डरकाळी

Manoj Jarange Patil : २७ ऑगस्ट रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या चलो मुंबई मोर्चाला सुरुवात होणार आहे. मोर्चाला सुरुवात करण्याआधी जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

Yash Shirke

Manoj Jarange Patlil Press Conference : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी आक्रमक झाले आहेत. आरक्षणासाठी चलो मुंबई या त्यांच्या मोर्चाला सुरुवात केली आहे. या मोर्चासाठीची, आंदोलनाची तयारी सुरु असल्याचे पाहायला मिळत आहे. २७ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीहून मुंबईच्या दिशेने मोर्चा रवाना होणार आहे. २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाड मैदानावर मनोज जरांगे पाटील हे मराठा आंदोलकांसह आंदोलन करणार आहेत.

या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. आंदोलनाला सुरुवात होण्यापूर्वी आज (२५ ऑगस्ट) मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी मोर्चाचा आराखडा सांगितला. आरक्षणाची अंमलबजावणी झाल्याशिवाय मागे हटणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

मराठा आरक्षणाचा गुल्ला उधळूनच परतणार

आम्हाला वाहतूक कोंडी करायला जायचे नाही. मुंबईमधील कोणताही एक रस्ता आम्हाला द्या. आम्हाला न्यायासाठी द्यायला जायचेय. कुणाला त्रास व्हायचा म्हणून आम्ही जात नाही. आम्ही चाकण मार्गे जात आहोत. कल्याण मार्गे जात नाही. आताच काही लोकं आझाद मैदानावर गेल्याचे समजलेय, असे मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषदेमध्ये म्हटले.

जरांगे पाटील म्हणाले, 'आम्ही आमच्या मागण्यावर ठाम आहे. मराठा आणि कुणबी एक आहेत, हा जीआर आम्हाला मंजुरीसह हवाय. त्याशिवाय आम्ही मुंबई सोडणार नाही. हैदराबादचे गॅझेट आम्हाला लागू केलेले हवं आहे. त्यावर अभ्यास सुरू आहे, खोटी माहिती आम्ही ऐकूण घेणार नाही. १३ महिन्यापासून गॅझेटिवर अभ्यास सुरू आहे. आता आम्ही ऐकू शकत नाही. जर आमच्या नोंदी सापडल्या आहेत, तर ते आम्हाला हवंय.'

'तिन्ही गॅझेटियर लागू केले म्हणून कुणी आडवे येणार नाही. आम्ही त्याशिवाय हटणार नाही. ओबीसीचा विरोध करायचा कारण नाही. आमचा जमिनीचा सातबारा सापडला आहे, त्यामुळे आम्हाला देणं भाग आहे. फडणवीस यांनी मराठ्याचे विषय समजून घ्यावे. १० टक्के आऱक्षण नकोय, आम्हाला हक्काचे घर हवे आहे. आम्हाला हक्काचे आरक्षण हवे आहे', असे वक्तव्य जरांगे पाटील यांनी केले आहे.

जरांगे पाटील यांच्या मोर्चाचा मार्ग

  • २७ ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता मुंबईसाठी निघणार. जुन्नरमध्ये मुक्काम असेल.

  • २८ ऑगस्ट रोजी शिवनेरी गडाचे दर्शन घेऊन, राजगुरू खेड मार्गे चाकणला. चाकणहून तळेगाव लोणावळा, पनवेल, वाशी

  • २८ ऑगस्ट रोजी संध्याकाळी आझाद मैदान

  • २९ ऑगस्ट रोजी आझाद मैदानावर बेमुदत उपोषण सुरू

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Actor : आणखी एक मराठी अभिनेता अडकणार लग्नबंधनात, 'या' अभिनेत्रीसोबत थाटणार संसार

Cyclone Alert : मोंथा चक्रीवादळ निवळलं? राज्यात पावसाचा जोर कायम, 15 जिल्ह्यांना यलो अलर्ट

Maharashtra Live News Update: निलेश घायवळच्या आई -वडिलांना पुणे पोलिसांचे पत्र

Shocking: रिलच्या नादात ट्रेनची धडक, फुटबॉलसारखा उडाला; तरूणाचा जागीच मृत्यू, VIDEO व्हायरल

PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेचा २१वा हप्ता तुम्हाला मिळणार की नाही? अशा पद्धतीने चेक करा स्टेट्स

SCROLL FOR NEXT