Ladki Bahin Yojana: मार्चचे १० दिवस उलटले, अजून फेब्रुवारीचा हप्ता आला नाही;लाडक्या बहि‍णींना ₹१५०० कधी मिळणार?

Ladki Bahin Yojana February Installment Date: लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी फेब्रुवारीच्या हप्त्याची वाट पाहत आहे. आता मार्चचा आठवडा उलटून गेला तरीही पैसे जमा न झाल्याने अनेक प्रश्न विचारले जात आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार?

मार्च सुरु झाला तरी पैसे जमा झाले नाही

१५०० रुपयांबाबत महत्त्वाची अपडेट

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना फेब्रुवारीचा हप्ता देण्यात आलेला नाही. फेब्रुवारी महिना संपून गेला आहे त्यानंतर मार्चचे पहिले १० दिवस उलटून गेले आहेत तरीही महिलांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. फेब्रुवारीचा हप्ता जवळपास दीड महिना पुढे ढकलला आहे. त्यामुळे पैसे कधी येणार, असा प्रश्न विचारला जात आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: फेब्रुवारीचा हप्ताही लांबणीवर? लाडक्या बहिणींना कधी मिळणार १५०० रुपये? काय आहे नवी अपडेट

फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Yojana February Installment Date)

फेब्रुवारीचा हप्ता मार्च महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यांमध्ये येऊ शकतो. गेल्या अनेक दिवसांपासून महिन्याच्या शेवटच्या दोन आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा केले जातात. त्यानंतर आतादेखील शेवटच्या आठवड्यात पैसे जमा केले जाऊ शकतात. दरम्यान, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

फेब्रुवारी-मार्चचा हप्ता एकत्र येणार? (Ladki Bahin Yojana February-March Installment Get Together)

एकीकडे फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार, असा प्रश्न विचारला जात आहे. दुसरीकडे फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याआधीही दोन हप्ते एकत्र देण्यात आले आहेत. त्यामुळे यावेळीदेखील महिलांच्या खात्यात ३००० रुपये एकत्र येऊ शकतात. याबाबत लवकरच माहिती दिली जाईल.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींचा फेब्रुवारीचा हप्ता रखडला, मार्चचे ₹१५०० कधी येणार? वाचा सविस्तर

लाडक्या बहिणींनो हे काम आताच करा (Ladki Bahin Yojana eKYC)

लाडकी बहीण योजनेचा लाभ फक्त त्याच महिलांना मिळणार आहे ज्या महिलांनी केवायसी केली आहे. केवायसी करण्याची मुदत संपून गेली आहे. परंतु ज्यांच्या केवायसीमध्ये दुरुस्ती आहेत त्यांच्यासाठी ही चुक सुधारण्याची शेवटची संधी आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: महत्त्वाची बातमी! एप्रिलपासून फक्त 'या' महिलांनाच मिळणार ₹१५००; कारण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com