शेतकऱ्यांसाठी 2 लाखांची कर्जमाफी जाहीर; पण लाभ कधी मिळणार?

Maharashtra Farmer Loan Waiver Scheme 2026: राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केली.. मात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ कधी मिळणार? कोणते शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र ठरणार? आणि कर्जमाफीची प्रक्रिया नेमकी कशी असणार? पाहूयात यावरचा हा स्पेशल रिपोर्ट....
Maharashtra government announces ₹2 lakh farm loan waiver to provide relief to debt-ridden farmers
Maharashtra government announces ₹2 lakh farm loan waiver to provide relief to debt-ridden farmersSaam Tv
Published On

राज्यातील कर्जाच्या विळख्यात सापडलेल्या बळीराजाला आधार देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घोषणा केली... राज्यातील शेतकऱ्यांच्या डोक्यावरील कर्जाचा डोंगर उतरवण्यासाठी शेतकऱ्यांना 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी कऱण्याची घोषणाच अर्थसंकल्प मांडताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलीय.. मात्र हा सरकारने केलेला शाब्दिक खेळ असल्याचा आरोपच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलाय..

दुसरीकडे शेतकरी नेत्यांनी सरकारच्या घोषणेचं स्वागत केलं असलं तरी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचं 30 जून 2026 पर्यंतचं कर्ज माफ करण्याची मागणी किसान सभेनं केलीय.. खरंतर कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी तर कधी सरकारच्या बोटचेप्या आयात निर्यात धोरणामुळे शेतमालाला योग्य भाव मिळत नाही... त्यामुळे शेतकरी कधी कर्जाच्या विळख्यात अडकत जातो... याच शेतकऱ्याला कर्जमाफी देण्यासाठी राज्यात मोठं आंदोलन उभं राहिलं होतं... त्यानंतर सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कर्जमाफीचा अभ्यास करण्यासाठी समितीची घोषणा केली.. एका बाजूला समितीचा अभ्यास सुरु असतानाच सरकारने शेतकऱ्यांसाठी 2 लाख रुपयांची कर्जमाफीची घोषणा केलीय.. मात्र या कर्जमाफीची प्रक्रिया नेमकी कशी असणार आहे?

30 सप्टेंबर 2025 रोजी शेतकरी कर्जमाफीची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली..या समितीने 52 लाख 80 हजार शेतकऱ्यांच्या बँक खात्यांचा अभ्यास करत आहे.. ही समिती एप्रिल 2026 पर्यंत सरकारला अहवाल सादर करणार आहे.. या शिफारसीनुसार 30 सप्टेंबर 2025 आधी थकीत असलेल्या पात्र शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्यात येणार आहे... तर ही कर्जमाफी 30 जून 2026 पर्यंत शेतकऱ्यांना मिळेल, असंही सरकारने स्पष्ट केलंय..

2017 मध्ये शेतकऱ्यांच्या दीड लाखापर्यंतच्या थकीत कर्जासाठी छत्रपती शिवाजी महाराज कर्जमाफी योजनेची घोषणा केली होती.. त्यानंतर डिसेंबर 2019 मध्ये उद्धव ठाकरेंनीही मुख्यमंत्री असताना महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली... त्यानंतर आता पुन्हा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने शेतकऱ्यांसाठी 2 लाखापर्यंतची कर्जमाफी जाहीर करण्यात आलीय... त्यामुळे आतापर्यंत केंद्र आणि राज्य सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी प्रमाणेच ही योजनाही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसणार की शेतकरी खरंच कर्जमुक्त होणार... याकडे राज्यातील दीड कोटी शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय..

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com