Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींच्या खात्यात ₹३००० जमा होणार? फेब्रुवारी-मार्चचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता

Ladki Bahin Yojana February-March Installment Come Together: लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता फेब्रुवारी आणि मार्चचा हप्ता एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Ladki Bahin Yojana
Ladki Bahin YojanaSaam Tv
Published On
Summary

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी

फेब्रुवारीचा हप्ता लांबणीवर

फेब्रुवारी-मार्चचे ३००० रुपये एकत्र येण्याची शक्यता

लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता फेब्रुवारी महिना संपला आहे तरीही महिलांच्या खात्यात मागच्या महिन्याचे पैसे जमा झाले आहे. याउलट फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात जानेवारीचा हप्ता देण्यात आला होता. त्यामुळे फेब्रुवारीचा हप्ता लांबणीवर गेला आहे. दरम्यान, यानंतर आता मार्चच्या हप्त्याबाबतही चर्चा सुरु झाल्या आहेत.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडकी बहिणींना आता १५०० नाहीतर २१०० रुपये मिळणार; अर्थसंकल्पीय अधिवेशनात होणार घोषणा?

फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार? (Ladki Bahin Yojana February Installment Date)

लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारीचा हप्ता कधी येणार असा प्रश्न सर्वांनाच पडलेला आहे. फेब्रुवारीचा हप्ता हा मार्च महिन्यात दिला जाऊ शकतो. या महिन्यात कधीही महिांच्या खात्यात ₹१५०० रुपये येऊ शकतात. त्यामुळे महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

फेब्रुवारी-मार्चचा हप्ता एकत्र येणार? ( Ladki Bahin Yojana February-March Installment Come Together)

लाडकी बहीण योजनेत फेब्रुवारी- मार्चचा हप्ता एकत्र येणार का अशा चर्चा सुरु झाल्या आहेत. मध्यंतरी एकदा दोन हप्ते एकाच महिन्यात दिले होते. त्यामुळे यावेळेसदेखील महिलांच्या खात्यात ३००० रुपये एकत्र येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र, हे पैसे कधी येणार याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल, असं बोललं जात आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना रखडलेले हप्ते मिळणार; सरकारने घेतला मोठा निर्णय

या महिलांना ४ हप्ते एकत्र मिळणार

लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांच्या केवायसीमध्ये चुका झाल्या आहेत. केवायसीमधील चुकांमुळे महिलांचे हप्ते रखडलेले आहेत. डिसेंबरपासून त्यांना पैसे मिळाले नाहीत. त्यामुळे डिसेंबरचे ते मार्च असे हप्ते एकत्र दिले जाऊ शकतात. मार्चमध्ये केवायसीमध्ये दुरुस्ती करण्याची शेवटची तारीख आहे. त्यानंतर रखडलेले हप्ते एकत्र दिले जाण्याची शक्यता आहे.

Ladki Bahin Yojana
Ladki Bahin Yojana: ८६ लाख लाडक्या बहिणींना मिळाला नाही जानेवारीचा हप्ता; ₹१५०० न येण्यामागचं कारण काय?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com