सॉफ्टवेअर इंजिनिअर हार्दिकने बहिणीवर ४० वार केले, आईलाही सोडले नाही; हत्येमागचं डोकं सुन्न करणारं कारण समोर...

Hardik Malhotra crime news : उत्तर प्रदेशातील मुरादाबादमध्ये सॉफ्टवेअर इंजिनिअर हार्दिक मल्होत्राने आपल्या बहिणीवर 40 वेळा वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
Moradabad Software Engineer Hardik Malhotra Case
Moradabad Software Engineer Hardik Malhotra CaseGoogle
Published On

Moradabad Software Engineer Hardik Malhotra Case : उत्तर प्रदेशातील मुरादाबादमधून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना (Crime News) समोर आली आहे. एका उच्चशिक्षित सॉफ्टवेअर इंजिनिअरने आपल्याच बहिणीची निर्घृण हत्या केली. आरोपी हार्दिकने (Hardik) आपली सख्खी बहीण हिमशिखा (Himshikha) हिच्यावर एकामागून एक तब्बल ४० वेळा वार (Stabbed 40 times) केले आणि त्यानंतर आपल्या आईलाही सोडले नाही.

हार्दिकच्या हल्ल्यात त्याची आई गंभीर जखमी झालेली आहे. आई सध्या उपचार घेत आहे. या हत्या प्रकरणामुळे (Moradabad Murder Case) संपूर्ण मुरादाबादमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ज्या हातांनी संगणकावर कोडिंग करायचे, त्याच हातांनी आपल्या कुटुंबाचा असा क्रूर अंत का केला? या हत्येमागचे जे धक्कादायक कारण (Shocking Reason) समोर आले आहे ते ऐकून उत्तर प्रदेश पोलिसांच्या (UP Police) पायाखालची जमीनही सरकली आहे.

Moradabad Software Engineer Hardik Malhotra Case
Kolhapur : कोल्हापूर सुन्न! जंगलात आढळला निवस्त्र मृतदेह, चेहरा-मानेवर वार अन्...

नैराश्य आणि करिअरमधील अपयश (Depression & Career Struggle)

उत्तर प्रदेशातील मुरादाबाद येथे हार्दिक मल्होत्राने आपल्या बहिणीची हत्या आणि आईवर प्राणघातक हल्ला केल्याची घटना अत्यंत धक्कादायक आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हार्दिकचे पुण्यातील एका मुलीसोबत इन्स्टाग्रामवर प्रेमसंबंध होते. ७-८ महिन्यांपूर्वी त्यांचे ब्रेकअप झाले होते. आपल्या आईने (नीलिमा) आणि जुळ्या बहिणीने (हिमशिखा) मिळून हे नाते तोडल्याचा संशय हार्दिकला होता. याच रागातून त्याने बहिणीवर ४० वार केले, त्यानंतर आईलाही सोडले नाही.

Moradabad Software Engineer Hardik Malhotra Case
Nashik : नाशिकमध्ये सर्वात मोठा भूखंड घोटाळा उघड, ४९ बिल्डर कचाट्यात सापडले, वाचा नेमकं प्रकरण काय?

अत्यंत थंड डोक्याने केलेला कट (Pre-planned Murder)

पुण्यातील मुलीसोबत ब्रेकअपनंतर हार्दिक नैराश्यात (Depression) गेला होता. हार्दिक सॉफ्टवेअर इंजिनिअर म्हणून काम करत होता. त्याने नोकरी सोडून युट्युबवर करिअर करण्याचा प्रयत्न केला होता. घरचे लोक त्याला समजावण्याचा प्रयत्न करत होते. पण त्याला ते हस्तक्षेप वाटत होते. त्यातच त्याचे ब्रेकअप झाले. हार्दिकने आई आणि बहिणीवर हा हल्ला अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केला. ६ मार्च २०२६ रोजी आई कामावर असताना त्याने बहिणीवर चाकूने ४० पेक्षा जास्त वार करून हत्या केली. त्यानंतर आईला "सरप्राईज" देण्याच्या बहाण्याने ऑफिसमधून घरी बोलावले आणि त्यांच्यावरही हल्ला केला. या प्रकारानंतर उत्तर प्रदेश हादरलेय.

Moradabad Software Engineer Hardik Malhotra Case
Pune : शिंदे, शेंडगे अन् काकडे; पुणे महापालिकेतील १० स्वीकृत नगरसेवकांची नावं निश्चित, वाचा यादी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com