Pune : शिंदे, शेंडगे अन् काकडे; पुणे महापालिकेतील १० स्वीकृत नगरसेवकांची नावं निश्चित, वाचा यादी

Pune Municipal Corporation : पुणे महानगरपालिकेत 10 स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली असून त्यामध्ये भाजपला 7 जागा, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 2 आणि काँग्रेसला 1 जागा मिळाली आहे.
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSaam
Published On

सचिन जाधव, पुणे प्रतिनिधी, साम टीव्ही मराठी

Pune Municipal Corporation nominated corporators list 2026 : पुणे महापालिकेत आज १० स्वीकृत नगरसेवकांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. पुणे महानगरपालिकेत सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपचे ७, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे २ तर काँग्रेसचा १ असे स्वीकृत नगरसेवक निवडण्यात आले आहेत. पुणे महापालिका निवडणूक होऊन एक महिन्यानंतर स्वीकृत नगरसेवकांची निवड करण्यात आली आहे. महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ११९ जागा जिंकत सर्वात मोठा पक्ष म्हणून महापालिकेत सत्ता मिळवली आहे.

महापौर, उपमहापौर, सभागृह नेते आणि स्थायी समिती अध्यक्ष या सर्व पदावर भाजपचे वर्चस्व आहे. त्यामुळे स्वीकृत नगरसेवकांमध्ये ही भाजपला सात स्वीकृत नगरसेवक यामध्ये निवडण्याची संधी मिळाली. त्यासाठी जवळपास ३०० जण इच्छुक असल्याचं सभागृह नेत्यांनी सांगितले होते. भाजपने निष्ठावांतांना संधी देत ७ जणांची निवड केली. काकडे, शेंडगे आणि पुरोहित यांना भाजपकडून संधी देण्यात आलेली आहे.

Pune Municipal Corporation
Israel Iran war : तेहरानमध्ये 'काळा पाऊस'! इराण-इस्रायल युद्ध आता सामान्यांच्या जीवावर | VIDEO

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाकडून दोन जणांना संधी देण्यात आली आहे. त्यामध्ये अनुभवी म्हणून माजी महापौर दत्तात्रय धनकवडे यांची निवड करण्यात आली आहे. तर युवक राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी राकेश कामठे यालाही उमेदवारी देण्यात आले आहे. दोन जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसकडून जवळपास 100 जण इच्छुक होते तर काँग्रेसने एका जागेवर कामगार नेते सुनील शिंदे यांची निवड केली आहे. काँग्रेसकडून जवळपास एका जागेसाठी ६८ जण इच्छुक होते.

पुणे महापालिकेसाठी 10 स्वीकृत नगरसेवकांची निवड

Pune Municipal Corporation
Todays Gold Rate : सोनं ₹१५०० नी घसरले, प्रति तोळा इतक्या रूपयांवर पोहचले, वाचा सुवर्णनगरीतील ताजे दर

पुणे महापालिका भाजपचे स्वीकृत नगरसेवक

निलेश कोंढाळकर

प्रियंका शेंडगे

विश्वास नानावरे

राजेंद्र काकडे

रवी साळेगावकर

जयप्रकाश पुरोहित

उदय लेले

काँग्रेस

सुनील शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी

दत्तात्रय धनकवडे

राकेश कामठे

Pune Municipal Corporation
विश्वचषकादरम्यान इशानवर दुःखाचा डोंगर; चुलत बहिणीचे कार अपघातात निधन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com