Israel Iran war : तेहरानमध्ये 'काळा पाऊस'! इराण-इस्रायल युद्ध आता सामान्यांच्या जीवावर | VIDEO

Israel Iran war latest updates : इस्रायलच्या हवाई हल्ल्यानंतर इराणमधील तेल रिफायनरी आणि पाईपलाईन्सचे मोठे नुकसान झाले असून तेहरानमध्ये ‘तेलाचा पाऊस’ पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Tehran pollution after refinery attack : इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्ष आता केवळ युद्धभूमीपुरता मर्यादित न राहता पर्यावरणासाठीही घातक ठरू लागला आहे. इस्रायलने इराणमधील तेल शुद्धीकरण प्रकल्पांना (Refineries) लक्ष्य करून जोरदार हवाई हल्ले केले होते. या हल्ल्यांनंतर इराणची राजधानी तेहरान आणि आसपासच्या परिसरात 'तेलाचा पाऊस' पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे वातावरणात मोठ्या प्रमाणात घातक रसायने पसरलीत.

नेमकं काय घडलं?

इस्रायली हल्ल्यात इराणच्या तेल साठ्यांचे आणि पाईपलाईन्सचे मोठे नुकसान झाले. यामुळे मोठ्या प्रमाणात कच्च्या तेलाची वाफ आणि कण वातावरणात मिसळले गेले. जेव्हा पाऊस पडला, तेव्हा हे तेलाचे अंश पावसाच्या थेंबांसोबत जमिनीवर आले. स्थानिक नागरिकांनी रस्ते, गाड्या आणि घरांच्या छतावर तेलाचे काळे थर साचल्याचे पाहिले. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण असून आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com