Manoj Jarange : २९ ऑगस्टला मुंबईत एल्गार! याआधी मनोज जरांगे पाटलांनी कधी-कधी केलं आंदोलन?

Manoj Jarange Patil : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर मनोज जरांगे पाटील आंदोलन करणार आहेत. याआधी त्यांनी केलेल्या आंदोलनांची माहिती जाणून घ्या...
Manoj Jarange Patil
Manoj Jarange Patilx
Published On
Summary
  • मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी २९ ऑगस्टला मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करणार आहेत.

  • ते मागील दोन वर्षांपासून सातवेळा आमरण उपोषण करून आरक्षण मागणीसाठी आंदोलन करत आहेत.

  • २७ ऑगस्टला अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना होऊन २९ ऑगस्टला आझाद मैदानात पोहोचणार आहेत.

Manoj Jarange Patil Protest : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील हे मागील दोन वर्षांपासून आंदोलन करत आहेत. त्यांनी मराठा आरक्षणासाठी आतापर्यंत सातवेळा आमरण उपोषण केले आहे. ते आता पुन्हा एकदा मुंबईवारी करणार आहेत. २७ ऑगस्ट रोजी अंतरवाली सराटीतून मुंबईच्या दिशेने रवाना होणार आहेत. २९ ऑगस्ट रोजी मुंबईच्या आझाद मैदानावर ते आंदोलन करणार आहेत.

असा असणार अंतरवाली सराटी ते मुंबईचा मार्ग

- २७ ऑगस्टला सकाळी १० वाजता अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना होणार

- शहागड फाटा - साष्ट पिंपळगाव- आपेगाव - पैठण -घोटण - शेवगाव -मिरी मका मार्गे - पांढरीपुल -अहिल्यानगर बायपास मार्गे- नेप्ती चौक -आळा फाटा , किल्ले शिवनेरी पोहोचणार

किल्ले शिवनेरीवर मनोज जरांगे पाटील यांचा मुक्काम असणार

- २८ ऑगस्टला मनोज जरांगे पाटील किल्ले शिवनेरीचे दर्शन घेऊन राजगुरुनगर मार्गे - चाकण - तळेगाव - लोणावळा - पनवेल - वाशी - चेंबूर मार्गे मुंबईच्या आझाद मैदानावर पोहोचणार

- २९ ऑगस्टला आंदोलनासाठी आझाद मैदानावर हजर असणार..

Manoj Jarange Patil
Maharashtra Politics : राज ठाकरेंना मोठा झटका, मनसेचा बडा नेता भाजपच्या वाटेवर

मनोज जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या

- मराठा कुणबी एक असल्याचा जीआर काढा, हैदराबादसह सातारा आणि बॉम्बे गॅझेट लागू करा

- आरक्षणासाठी सगेसोयरे अधिसूचनेची अंमलबजावणी करा

- मराठा आरक्षणाच्या काळात दाखल झालेले गुन्हे मागे घ्यावे

- मराठा आरक्षणासाठी बलिदान देणाऱ्याच्या वारसांना नोकरी द्यावी

Manoj Jarange Patil
Dream11 : बीसीसीआयला मोठा धक्का, ड्रीम ११ ने स्पॉन्सरशिपमधून घेतली माघार

जरांगे पाटील यांनी यापूर्वी आरक्षणासाठी केलेले उपोषण आंदोलन

उपोषण पहिले

- २९ ऑगस्ट २०२३ - मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसले.

- १ सप्टेंबर २०२३ - जरांगे पाटील यांच्या उपोषणस्थळी उपोषणाच्या चौथ्या दिवशी पोलिसांकडून आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला. त्यानंतर महाराष्ट्रातील नेते,संघटना यांनी मनोज जरांगे यांना भेटी दिल्या.

- १४ सप्टेंबर २०२३ - मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते पहिलं उपोषण सरकारला 40 दिवसांची मुदत देऊन स्थगित केले.

Manoj Jarange Patil
Pune : पुण्यात १७ हजार मतदार बोगस? सरपंचाचा खळबळजनक दावा; पुरावेही दाखवले

उपोषण दुसरे

  • २५ ऑक्टोबर २०२३ - सरकारने आरक्षणाबाबत कोणतीही हालचाल न केल्यामुळं पुन्हा मनोज जरांगे उपोषणाला बसले.

  • ३० ऑक्टोबर २०२३ - माजलगाव आणि बीडमध्ये हिंसाचार आणि जाळपोळ झाली.

  • २ नोव्हेंबर २०२३ - न्यायमूर्ती एम जे गायकवाड, सुनील शुक्रे, उदय सामंत, धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत मनोज जरांगे यांनी सरकारला 24 डिसेंबरपर्यतची मुदत देऊन उपोषण स्थगित केले.

जरांगेंचा मुंबई मार्च

  • २० जानेवारी २०२४ - मनोज जरांगे मराठा आंदोलकांसह अंतरवाली सराटीतून मुंबईकडे रवाना झाले..

  • २६ जानेवारी २०२४ - मुख्यमंत्रांनी सगे सोयरे अध्यादेशाची प्रत दिल्यानंतर जरांगें पुन्हा अंतरवाली पोहोचले..

Manoj Jarange Patil
EPFO खाते असणाऱ्यांच्या कुटुंबीयांना १५ लाख रुपये मिळणार? पण कसे? जाणून घ्या...

उपोषण तिसरे

  • १० फेब्रुवारी - मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र आणि सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणीसाठी पुन्हा उपोषणाला बसले.

  • २० फेब्रुवारी - विधानसभेचे विशेष अधिवेशनात मराठ्यांना 10 टक्के आरक्षणाचं विधेयक विधानसभेत मंजूर झाले.

  • २५ फेब्रुवारी - उपोषणा दरम्यान मनोज जरांगे मुंबईतील सागर बंगल्यावर निघाले.जरांगेंना पोलिसांनी भांबेरी गावात रोखल.

  • २६ फेब्रुवारी -17 व्या दिवशी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवाली सराटीतील महिलांच्या हस्ते सरबत पिवून उपोषण सोडले.

Manoj Jarange Patil
गर्लफ्रेंडला हॉटेलला बोलावलं, शरीरसंबंधांनंतर विवाहित पुरुषाचा मृत्यू; रुममध्ये विपरित घडलं

उपोषण चौथे

  • ८ जून - सगे सोयरे कायद्याची अंमलबजावणी करावी या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी चौथ्या आमरण उपोषणाला सुरुवात केली.

  • १३ जून - राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांनी 13 जुलै पर्यत मागण्या पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर मनोज जरांगे यांनी चौथ आमरण उपोषण स्थगित केलं.

उपोषण पाचवे

  • २० जुलै - सगे सोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी करावी यासह राज्यातील गुन्हे सरसकट मागे घ्यावे या मागणीसाठी पुन्हा मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले.

  • २४ जुलै - गावातील महिलांच्या हस्ते उपोषण सोडलं.

Manoj Jarange Patil
Gautam Gaikwad Sinhgad : सिंहगड किल्ल्यावर बेपत्ता झालेला गौतम गायकवाड अखेर सापडला

उपोषण सहावे

  • १७ सप्टेंबर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुन्हा एकदा मनोज जरांगे पाटील आमरण उपोषणाला बसले.

  • २५ सप्टेंबर - गावातील महिलांच्या हस्ते मनोज जरांगे पाटील यांनी आमरण उपोषण सोडलं.

उपोषण सातवे

  • २५ जानेवारी - आमरण उपोषणाला बसले

  • 30 जानेवारी - खासदार बजरंग सोनवने, आमदार सुरेश धस, आमदार प्रकाश सोळुके, जालना जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते उपोषण सोडलं...

Manoj Jarange Patil
हृदयविकाराच्या झटक्याने मुलाचा मृत्यू, लेकाच्या मृत्यूचा धक्का सहन न झाल्याने आईनेही प्राण सोडले

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com